'तुझ्यामुळे ती माझ्याशी बोलत नाही' राग अनावर; शाळकरी विद्यार्थ्याकडून मित्राचा कोयत्याने खून

Pune Crime: . हल्लेखोर विद्यार्थी आणि मृत विद्यार्थी यांची एक कॉमन मैत्रिण होती. मैत्रिण प्रकाशसोबत बोलते मग माझ्यासोबत का नाही? असा विचार हल्लेखोराच्या मनात यायचा.

Pravin Dabholkar | Updated: Mar 19, 2024, 11:35 AM IST
'तुझ्यामुळे ती माझ्याशी बोलत नाही' राग अनावर; शाळकरी विद्यार्थ्याकडून मित्राचा कोयत्याने खून title=
School Student Murder

Pune Crime: गैरसमज आणि संताप यातून व्यक्ती कोणत्या थराला जाईल सांगता येत नाही. शालेय विद्यार्थ्यांमध्येही द्वेश, मत्सर वाढीला लागला आहे. यातून एखाद्याचे जीवन संपवण्यापर्यंत निर्णय घेतला जातो. असाच एक धक्कादायक प्रकार पुण्यातून समोर आलाय. मैत्रीच्या वादातून 15 वर्षीय शाळकरी विद्यार्थ्याचा कोयत्याने खून करण्यात आलाय. काय घडलीय ही घटना? सविस्तर जाणून घेऊया. 

झोपेत असताना तरुणावर कोयत्याने आणि धारधार शस्त्राने हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मैत्रीत झालेल्या गैरसमजातून काही मिनिटांत मित्राचे आयुष्य संपवले गेलं. पुण्यातील पानशेत रस्त्यावरील मणेरवाडी येथील आनंदवन सोसायटीत थरारक घटना घडली. प्रकाश हरिसिंग रजपूत असे 15 वर्षीय मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांचे नाव आहे. हत्येमागे शाळेच्या मैत्रीचे कारण सांगितले जात आहे. हल्लेखोर विद्यार्थी आणि मृत विद्यार्थी यांची एक कॉमन मैत्रिण होती. मैत्रिण प्रकाशसोबत बोलते मग माझ्यासोबत का नाही? नक्कीच प्रकाशने काहीतरी सांगितलं असणार, असा हल्लेखोराला समज झाला होता.

आयुष्यातील अखेरची झोप

मिळालेल्या माहितीनुसार, प्रकाश हा खानापूर येथील महात्मा गांधी विद्यालयात इयत्ता नववीमध्ये शिक्षण घेत होता. तो दररोज सारखा शाळेत गेला. 10.30 वाजता शाळा सुटली आणि तो घरी आला. मणेरवाडी हद्दीतील मह डोंगरावरील आनंद सोसायटीत तो राहायला होता. फार्ममधील घरात प्रकाश झोपला होता. ही झोप आयुष्यातील अखेरची असेल असे त्याला स्वप्नातही वाटले नसेल.

शंभर फूट अंतरावर कोसळला

हल्लेखोरांनी प्रकाशच्या डोक्यात कोयते, धारधार शस्त्रांनी वार केले. जीव वाचवण्यासाठी तो घरातून पळत सुटला. मात्र शंभर फूट अंतरावर तो कोसळला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला.

शाळेची मैत्रिणी बोलत नव्हती

प्रकाशची हत्या झाल्यानंतर पोलीस तपासात एक कहाणी समोर आली. प्रकाश आणि हल्लेखोर 2 अल्पवयीन तरुणांची एक मैत्रीण होती. हल्ला करणाऱ्या एका मुलाशी ती मुलगी बोलत नव्हती. प्रकाशच्या सांगण्यावरून ती माझ्याशी बोलत नसल्याचा राग मनात ठेवून त्याने हे कृत्य केल्याचं निष्पन्न झाल आहे. तरी पोलीस यासंदर्भात अधिक चौकशी करत आहेत.