पैशाचा पाऊस पाडणाऱ्या भोंदू बाबाला बनावट पोलिसांनी धुतलं; 18 लाख घेऊन काढला पळ

Pune Crime : पुण्यात जादूटोण्याचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पैशांचा पाऊस पाडतो म्हणून एका तरुणाचे 18 लाख रुपये बनावट पोलिसांनी लुटले आहेत. हडपसर पोलिसांनी याप्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

आकाश नेटके | Updated: Dec 4, 2023, 10:55 AM IST
पैशाचा पाऊस पाडणाऱ्या भोंदू बाबाला बनावट पोलिसांनी धुतलं; 18 लाख घेऊन काढला पळ title=

सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : सुसंस्कृत पुरोगामी म्हणवल्या जाणाऱ्या पुण्यात (Pune Crime) जादूटोण्याचा (Black Magic) धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पैशाचां पाऊस पाडतो म्हणून एका भोंदू बाबाने तरुणाचे 18 लाख रुपये पळवल्याचे समोर आलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे यामध्ये बनावट पोलिसांचा देखील समावेश होता. पोलिसांनी (Pune Police) याप्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हडपसर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

पुण्याच्या हडपसर परिसरात असलेल्या ससाणे नगर परिसरात पैशांचा पाऊस पडण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कोट्यावधी रुपयांच्या पैशाचे पाऊस पडतो असे सांगत एका तरुणाचे 18 लाख रुपये पळवणारा बाबा आईरा शॉब याच्यासह माधुरी मोरे रॉकी वैद्य आणि किशोर पंडागळे या चार जणांवर पुण्यातील हडपसर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी विनोद छोटेलाल परदेशी यांना त्यांच्या मित्रमार्फत पैशाचे पाऊस पडतो असे सांगून बाबाने एक अघोरी पूजा मांडायला सांगितली होती. या पूजेसाठी 18 लाख रुपये रोख तिथे आणण्यात आले होते. मात्र तिथे आधीच आरोपींनी विनोद छोटेलाल परदेशी यांना फसवण्याचा कट रचला होता. ठरल्याप्रमाणे आरोपींनी रोख रकमेसह पूजा सुरु केली. मात्र पूजा सुरू असताना अचानक त्या ठिकाणी काही बनावट पोलीस आले. त्यांनी बाबासह तरुणाला मारहाण करत या ठिकाणी पूजेसाठी ठेवलेले 18 लाख रुपये घेऊन पळ काढला. त्यानंतर विनोद परदेशी यांनी हडपसर पोलीस ठाणे गाठत आपली तक्रार दाखल केली. या प्रकरणी आता या भोंदू बाबासह तिघांचा शोध पोलीस घेत आहेत.

करणीच्या नावाखाली भोंदूगिरी करणाऱ्या भोंदूबाबाला अटक

करणी काढण्याच्या नावाखाली अघोरी उपाय करणाऱ्या सांगलीच्या वाळवा तालुक्यातील कारंदवाडी येथील एका भोंदू बाबाचा पर्दाफाश करण्यात आला आहे.अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि पोलिसांनी स्टिंग ऑपरेशन करत दैवी उपायाने करणे काढण्याच्या दावा करणाऱ्या प्रकाश विष्णू शेंबडे-पाटील उर्फ मामा याला अटक केली आहे.

कारंदवाडी येथील प्रकाश शेंबडे -पाटील हा आपल्या घरामध्ये करणी काढण्याचा अघोरी प्रकार करत असे,आपल्याला दैवी चमत्कार प्राप्त झाल्याची अफवा पसरवून भोंदूगिरी करत असल्याचा समोर आला होता,त्यानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आणि आष्टा पोलिसांकडून भांडाफोड करत अटक करण्यात आली आहे.