भटक्या कुत्र्यांच्या नसबंदीवेळी 'प्राणीप्रेमीं'चा अडथळा, पुणे पालिकेने घेतला 'हा' निर्णय

Pune Street Dogs: श्वान आणि मांजरांची नसबंदी शस्रक्रिया आणि लसीकरण करण्याच्या मोहिमेमध्ये अडथळा निर्माण करणाऱ्या संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे पुणे महानगर पालिकेने जाहीर केले आहे.

Updated: Aug 29, 2023, 10:19 AM IST
भटक्या कुत्र्यांच्या नसबंदीवेळी 'प्राणीप्रेमीं'चा अडथळा, पुणे पालिकेने घेतला 'हा' निर्णय title=

Pune Street Dogs: रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाढलेल्या भटक्या कुत्र्यांचे आणि मांजरांचे प्रमाण आटोक्यात आणणे हे मोठे आव्हान पुणे पालिकेसमोर आहे. यासाठी पालिकेने श्वान आणि मांजरांची नसबंदी शस्रक्रिया, लसीकरण मोहिम हाती घेतली आहे. पण या मोहिमेला काही संस्थांकडून अडथळा निर्माण करण्यात येत असल्याचे पालिकेकडून सांगण्यात येत आहे. याविरुद्ध आता पुणे पालिका आक्रमक झाली असून याविरोधात कडक पावले उचलली जात आहेत. 

श्वान आणि मांजरांची नसबंदी शस्रक्रिया आणि लसीकरण करण्याच्या मोहिमेमध्ये अडथळा निर्माण करणाऱ्या संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे पुणे महानगर पालिकेने जाहीर केले आहे.

पुणे महानगरपालिका हद्दीतील भटक्या आणि मोकाट असणाऱ्या श्वान, मांजरांची नसबंदी शस्त्रक्रिया व लसीकरण करण्याची मोहीम पुणे महानगरपालिके कडून अनेक वर्षांपासून सुरु आहे. ही मोहीम अ‍ॅनिमल वेलफेअर बोर्ड ऑफ इंडिया (AWBI) यांनी दिलेल्या मार्गदर्शक सूचनेचे तंतोतंत पालन करून राबविण्यात येते. पालिका हद्दीतील भटक्या आणि मोकाट असणाऱ्या श्वानांची आणि मांजरांची नसबंदी शस्त्रक्रिया व लसीकरण करण्यासाठी पुणे महानगरपालिकेने स्थायी समितीत ठराव संमत केला आहे. तसेच यासाठी युनिव्हर्सल अ‍ॅनिमल वेल्फेअर सोसायटी आणि कॅनिन कंट्रोल अ‍ॅण्ड केअर ट्रस्ट या दोन संस्थाची नेमणूक करण्यात आली आहे.

ही संस्था पुणे महानगरपालिका हद्दीतील भटके, मोकाट श्वान आणि मांजरांची नसबंदी शस्त्रक्रिया, लसीकरण करते. यावेळी प्राण्यांना पकडताना नागरिकांकडून संस्थेच्या गाड्या रस्त्यामध्ये अडविण्या येतात. तसेच नसबंदी शस्त्रक्रिया, लसीकरण करण्यासाठी पकडण्यात आलेले श्वान सोडण्यासाठी अथवा नसबंदी शस्त्रक्रिया व लसीकरण झालेले श्वान, मांजर तेथेच सोडण्यात येऊ नये यासाठी कर्मचारी यांच्यावर दमदाटी करण्यात येते.

केंद्रीय पेट्रोकेमिकल्स संस्थेत बंपर भरती, दहावी उत्तीर्णांनी 'येथे' पाठवा अर्ज

नसबंदी शस्त्रक्रिया, लसीकरण झालेले श्वान आणि मांजर पुन्हा त्याच जागी सोडण्यात येऊ नये यासाठी अॅनिमल वेलफेअर बोर्ड ऑफ इंडियाने मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. नागरिक त्याचे उल्लंघन करत असून केंद्र सरकार, राज्य सरकारच्या नसबंदी शस्त्रक्रिया आणि लसीकरण मोहिमेत बाधा निर्माण केला जात असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले. पुणे महानगर पालिका आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.

संस्थाच्या कोणत्याही गाड्या रस्त्यामध्ये अडवून नसबंदी शस्त्रक्रिया आणि लसीकरण करण्याच्या मोहिमे मध्ये अडथळा निर्माण करू नये असे आवाहन पालिकेने केले आहे. तसे केल्यास संबंधितांविरुद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल असेही सांगण्यात आले आहे. 

आयकर विभागात पदवीधरांना नोकरीची संधी, 40 हजारपर्यंत मिळेल पगार