पुण्यातील भीषण अपघातानंतर ही महिला का होतेय Viral, ती आहे तरी कोण? पाहा video

नवले पुलावर झालेल्या अपघातानंतर सोशल मीडियावर एका महिलेचा व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय. सगळीकडे सध्या याच महिलेच्या व्हिडिओची चर्चा आहे. तिच्या व्हिडिओवर अनेक कॉमेंट्स येऊ लागले आहेत

Updated: Nov 21, 2022, 11:01 AM IST
पुण्यातील भीषण अपघातानंतर ही महिला का होतेय Viral, ती आहे तरी कोण? पाहा video title=

pune accident nvale bridge: रविवारी रात्री नवले पुलावर भीषण अपघात (pune navale bridge accident) झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात तब्बल 30 ते 40 गाड्यांचं नुकसान ( pune Accident 48 vehicles crashed ) झालंय. यामध्ये सुमारे 40 ते 50 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे. साताऱ्याहून मुंबईच्या (Satara To Mumbai) दिशेनं जात असलेल्या कंटेनरचा ब्रेक निकामी झाला. त्यानंतर चालकाचं कंटेनरवरील नियंत्रण सुटलं आणि कंटेनर गाड्यांना उडवत वाडगाव पुलाजवळ आदळला. (pune accident lady video went viral on social media navale bridge truck hits vehicles dengerous road accident)

अपघातानंतर महिलेचा व्हिडीओ होतोय व्हायरल 

नवले पुलावर झालेल्या अपघातानंतर सोशल मीडियावर एका महिलेचा व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय. सगळीकडे सध्या याच महिलेच्या व्हिडिओची चर्चा आहे. तिच्या व्हिडिओवर अनेक कॉमेंट्स येऊ लागले आहेत शिवाय मोठ्या प्रमाणात हा व्हिडीओ पाहिला जात आहे. रस्त्यांवर बेजबाबदारपणे वाहने चालवणारा वाहकांना ही महिला खडेबोल सुनावताना दिसली. या व्हिडिओमध्ये बेदरकारपणे वाहन चालवून नुकसान करणार्यांना ही महिला खूप सुनावतेय. (pune accident lady video went viral on social media navale bridge truck hits vehicles dengerous road accident  )

असं काय केलयं महिलेने ?

हा व्हिडीओ साल 2021मधील असल्याची तारीखही व्हिडीओमध्ये दिसून येते. हा व्हिडीओ एका भाजप नेत्याच्या कार्यक्रमातील (bjp leader) असल्याच सांगितलं जातंय.  बऱ्याचदा खूप वेगाने गाडी चालवणे काही जणांना खूप हिमतीच वाटत खूप कूल वाटत पण या व्हिडिओमध्ये ही महिला सांगतेय वेगानं गाड्या चालवणं हे धाडसाचं काम नसून ते बेजबाबदार, लाचार आणि बेशिस्त असल्याचं लक्षण असल्याचं म्हटलंय. रस्त्यावर गाडी चालवताना वेगाला आवर घातला पाहिजे. गाडी चालवणाऱ्याने स्वतःच्या जीवाची पर्वा केलीच पाहिजे कारण हा जीव त्याला त्याच्या आईवडिलांनी दिलेला आहे, हे चालकांनी नेहमी लक्षात ठेवावं, असंही महिला म्हणाली आहे. (viral video pune accident navale bridge)

भीषण अपघातानंत 40 गाड्यांचं अतोनात नुकसान 

साताऱ्याहून मुंबईच्या (Satara To Mumbai) दिशेनं जात असलेल्या कंटेनरचा ब्रेक निकामी झाला. त्यानंतर चालकाचं कंटेनरवरील नियंत्रण सुटलं आणि कंटेनर 25 ते 30 गाड्यांना उडवत वाडगाव पुलाजवळ आदळला. त्यामुळे संपुर्ण रस्त्यावर ऑईल सांडल्याचं दिसतंय. रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास हा प्रकार घडला. 48 पैकी 24 गाड्यांना या अपघातात जबर फटका बसलाय. रात्री साडे आठ-नऊ  वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला होता. 

व्हिडीओ होतोय वेगाने व्हायरल 

हा व्हिडीओ व्हायरल होताच बऱ्याच कॉमेंट्स येऊ लागल्या आहेत एका युजर ने म्हटलंय कि,  या 'महिलेचा व्हिडीओ सरकारने रस्ते सुरक्षा अभियान म्हणून वापरावा', सध्या व्हिडिओतून व्हायरल होत असेलली ही महिला कोण आहे हे कळू शकलं नाहीये मात्र.. हा व्हिडीओ राजस्थानमधील सीकर या शहरातील असल्याचं कळतंय.  (pune accident lady video went viral on social media navale bridge truck hits vehicles dengerous road accident )