एक क्लिक करा शौचायल मिळवा

एका क्लिकवर तुम्हाला शौचालयाची माहिती मिळणार आहे. ठाणे महानगर पालिकेने हे करुन दाखवल आहे.

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Sep 9, 2017, 12:43 PM IST
एक क्लिक करा शौचायल मिळवा  title=

ठाणे : इंटरनेटमुळे दुनिया जवळ आली आहे. एका क्लिकवर आपल्याला जगभरातील माहिती मिळते. पण जवळ असणाऱ्या, गरजेच्या सेवा मिळण्यास कठीणाई येते. पण आता यापुढे अशी तक्रार कोणी करणार नाही. कारण एका क्लिकवर तुम्हाला शौचालयाची माहिती मिळणार आहे. ठाणे महानगर पालिकेने हे करुन दाखवल आहे.
गुगलच्या मदतीनं ठाण्याला हगणदारीमुक्त करण्याचे ठरविले आहे. त्यामुळे ठाणेकरांना एका क्लिकवर जवळील शौचालयाची माहिती मिळणार आहे. स्वच्छ भारत मिशनमध्ये हे महत्त्वाचे उदाहरण असणार आहे. 
 
ठामपा नेहमी नवनवीन लोककल्याणकारी योजना घेऊन येत असते. त्यात आता या नव्या योजनेची भर पडली आहे. ठामपाने उचलेल्या या पाऊलाचे सर्वत्र कौतुक होत आहे. याद्वारे शहरातील ११ हजाराहून अधिक शौचालयांची माहिती गुगलवर उपलब्ध होणार आहे.

केंद्राच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत ठाण्यातील सर्व सार्वजनिक शौचालये गुगलवर दिसणार आहेत. ठाणे महापालिकांतर्गत येणाऱ्या ११ हजार २१७ सार्वजनिक शौचालयांना आता टॉयलेट लोकेटरद्वारे गुगलवर टाकले जाणार आहे. 

कशी सुरू आहे तयारी ?

ठामपातर्फे यासाठी जोरदार तयारी केली जात आहे.  क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडियाच्या माध्यमातून यासाठी लागणारा संपूर्ण खर्च केला जाणार आहे. 
शहरातील सार्वजनिक शौचालये गुगल मॅपद्वारे टॉयलेट लोकेटर बसवण्यासाठी ३ कोटी ४ लाखांचा खर्च अपेक्षित आहे. 
येत्या २ ऑक्टोबरपर्यंत ही सेवा सुरू होणार असल्याचं पालिकेकडून सांगण्यात आले आहे.