'पद्मावती'विरोधात कोल्हापुरात आंदोलन

संजय लिला भन्साळी दिग्दर्शीत आणि निर्मित पद्मावती चित्रपटाच्या निषेधार्थ कोल्हापुरात आंदोलन करण्यात आलं.

Updated: Nov 14, 2017, 04:42 PM IST
'पद्मावती'विरोधात कोल्हापुरात आंदोलन  title=

कोल्हापूर : संजय लिला भन्साळी दिग्दर्शीत आणि निर्मित पद्मावती चित्रपटाच्या निषेधार्थ कोल्हापुरात आंदोलन करण्यात आलं. हिंदू आणि राजपूतांच्या इतिहासात 
बदल केल्याचा आरोप आंदोलकांनी केला. आंदोलकानी कोल्हापुरातील शिवाजी चौकात जोरदार निदर्शन केली. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्रात या चित्रपटावर बंदी घालावी अशी मागणी करण्यात आली. आंदोलकानी शहरातून दुचाकी रॅली काढून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. दिग्दर्शक संजय लिला भंसाळी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत मागण्यांचं निवेदन निवासी जिल्हाधिका-यांना देण्यात आलं.