Maharastra Politics: "नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना जेलमध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही"

Prakash Ambedkar sensational statement: आंबेडकरांनी थेट भाजपच्या दोन चेहऱ्यांना जखमी करण्याचा प्रयत्न केलाय. त्यामुळे आता राजकारणात (Maharastra Politics) मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे.

Updated: Jan 30, 2023, 11:47 PM IST
Maharastra Politics: "नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना जेलमध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही" title=
narendra modi,Amit Shah

Prakash Ambedkar On Narendra Modi: आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections 2024) पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Ambedkar) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्यावर आक्रमक टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर प्रकाश आंबेडकरांनी पातळी सोडून टीका केली. घरातला दारूड्या जसा घरातली भांडी विकतो तसंच मोदीही देश चालवण्यासाठी कारखाने विकत असल्याची टीका आंबेडकरांनी केली. तसंच 2024 मध्ये बिगर भाजप सरकार (BJP) सत्तेत आलं तर मोदी आणि शाह दोघांना जेलमध्ये जावं लागणार असल्याचंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे. (Prakash ambedkar sensational statement on pm narendra modi and home minister Amit Shah maharastra politics)

आम्ही 2024 मध्ये परत येऊ, मी म्हणतो 2029 मध्येही याल, आम्हा सगळ्यांना तुम्ही तुरुंगात टाकणार तर तुम्हाला विरोध करणार कोण? पण 2024 मध्ये भाजप आणि आरएसएसचं सरकार येऊ देऊ नका. सत्ता टिकवण्यासाठी भाजपनं एक कोणती चांगली गोष्ट केली आहे ते सांगावं, असं म्हणत आंबेडकरांनी (Prakash Ambedkar On BJP) भाजपला खुल्लं आव्हान दिलंय.

2024 मध्ये मी नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि अमित शाह (Amit Shah) यांना आत टाकल्याशिवाय राहणार नाही, असंही यावेळी प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) म्हणाले आहे. त्यावेळी त्यांनी थेट मोंदींना शिंगावर घेतलं. मोदींनंतर दुसरा पंतप्रधान (Prime Minister) कोण आहे?, असा सवाल त्यांनी विचारलाय. एकही माणूस आपल्या नजरेसमोर नाही जो देशाचं नेतृत्व करु शकतो, असंही आंबेडकर यावेळी म्हणालेत.

आणखी वाचा - Rahul Gandhi: 'भारत जोडो' बनवणार राहुल गांधींना विरोधकांचा चेहरा? काँग्रेसचं चित्र बदलणार का?

दरम्यान, शिवसेनेसोबत हातमिळवणी केल्यानंतर प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली. संजय राऊतांनी (Sanjay Raut) आंबेडकरांना सावरण्याचा प्रयत्न केल्यानंतर आंबेडकरांनी थेट राऊतांनाच उलटी चपराक लगावली. कोण संजय राऊत म्हणत त्यांनी राज्याच्या राजकारणात खळबळ माजवली होती. अशातच आता त्यांनी थेट भाजपच्या दोन चेहऱ्यांना जखमी करण्याचा प्रयत्न केलाय. त्यामुळे आता राजकारणात (Maharastra Politics) मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे.