प्रफुल्ल पटेलांनी खांद्यावर घेतली इंधन दरवाढीची प्रेतयात्रा

चौथ्या वर्धापनदिनी सरकार काहीसा दिलासा देईल अशी आशा सर्वसामान्यांना होती. मात्र...

Updated: May 26, 2018, 05:31 PM IST
प्रफुल्ल पटेलांनी खांद्यावर घेतली इंधन दरवाढीची प्रेतयात्रा title=

भंडारा : भंडाऱ्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून इंधर दरवाढी विरोधात सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते प्रफुल पटेल यांच्या नेतृत्वात  दुचाकीची  रॅली काढण्यात आली. वाढीव पेट्रोल -डिझेल दर तत्काळ कमी करण्यात यावे, असा निवेदन उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले असून माजी केंद्रीय मंत्री खा. प्रफुल्ल पटेल यांनी दुचाकीची शव यात्रा स्वतः खांद्यावर उचलत उपविभागीय अधिकारी कार्यालयापर्यंत घेऊन गेले

दरम्यान, सलग तेराव्या दिवशी इंधनाची दरवाढ सुरुच आहे. चौथ्या वर्धापनदिनी सरकार काहीसा दिलासा देईल अशी आशा सर्वसामान्यांना होती. मात्र पेट्रोल १३ पैशांनी महागलंय तर डिझेलच्या दरात १६पैशांनी वाढ झालीये. या दरवाढी मुळे मुंबईत पेट्रोल ८५ रुपये ७८ पैसे तर डिझेल ७३ रुपये ३६ पैसे लिटर एवढं महाग झालंय. या दरवाढीमुळे सर्वसामान्य जनतेची घोर निराशा झालीय. 

वाढत्या इंधनाच्या दरामुळे सामान्य जनतेमध्ये संतापाची भावना आहे हे लक्षात घेऊन मोदी सरकार यावर तोडगा काढण्याच्या तयारीत होते. पेट्रोल-डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणण्याचे संकेत पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिले होते. त्यातच शुक्रवारी रशियाने खनिज तेल उत्पादनाबद्दलच्या भूमिकेत थोडी नरमाई आणल्याने आंतरराष्ट्रीय बाजारातही कच्चं तेल काहीसं स्वस्त झालं होतं. त्यामुळे मोदी सरकारच्या चौथ्या वाढदिवशी काही अंशी तरी दिलासा मिळेल अशी आस सर्वसामान्य जनता बाळगून होती. मात्र जनतेच्या आशेवर पाणी फेरलं गेलंय.