शेती नुकसानीची पाहणी करण्यासाठी नेत्यांचे दौरे सुरु

परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान

Updated: Nov 2, 2019, 04:52 PM IST
शेती नुकसानीची पाहणी करण्यासाठी नेत्यांचे दौरे सुरु title=

मुंबई : शेती नुकसानीची पाहणी करण्यासाठी नेत्यांचे दौरे सुरु आहेत. राधाकृष्ण विखे-पाटलांचा नगर, आशिष शेलार सिंधुदुर्गात तर एकनाथ शिंदे औरंगाबाद जिल्हा दौऱ्यावर आहेत. राज्याचे माजी कृषीमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर आणि राहाता तालुक्यातील अतिवृष्टीनं बाधित झालेल्या शेतीची पहाणी केली. संगमनेर तालुक्यातील धांदरफळ आणि निमज आणि राहता येथे त्यांनी भेट देत झालेल्या नुकसानीची पाहणी केली.

कोकणातील ओल्या दुष्काळाची पाहणी भाजपा नेते आशिष शेलार यांनी केली. कुडाळ आणि सावंतवाडीतील उद्ध्वस्त भातशेतीची पाहणी शेलार यांनी केली. शेतकऱ्यांना मदत हेच आमच्या सरकारचं प्रमुख उद्दिष्ट असल्याचं आशिष शेलार यांनी यावेळी सांगितलं आहे.

परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या उध्वस्त झालेल्या पिकांची आज शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी पाहणी केली. औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यात त्यांनी पाहणी केली. शेतकऱ्यांना सरसकट मदत जाहीर केली जाईल असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं आहे.