मनमाडला परतीच्या पावसाचा फटका; कांदा पिकाचं नुकसान

रामगुळणा, पांझन नद्यांना पूर...

Updated: Nov 2, 2019, 04:37 PM IST
मनमाडला परतीच्या पावसाचा फटका; कांदा पिकाचं नुकसान title=

मनमाड : मनमाड परिसरात सुरू असलेल्या सततच्या पावसाने अनेक शेतात पाणी साचले आहे. त्यामुळे या भागातील प्रमुख नगदी पीक कांदा खराब होण्याची भीती यापूर्वीच शेतकऱ्यांनी व्यक्त केली होती. शुक्रवार रात्रीपासून मनमाड शहर व परिसरात रात्रभर पाऊस सुरु आहे. या पावसाने रेल्वे बंधारा व शहराला पाणी पुरवठा करणारे वागदर्डी धरण ओवर फ्लो झाले आहे. त्यामुळे शहरातून वाहणाऱ्या रामगुळणा व पांझन या दोन्ही नद्यांना मोठा पूर आला आहे. तब्बल १२ वर्षानंतर दोन्ही नद्या दुथडी भरून वाहत आहेत. पुराचे पाणी परिसरातील नागरी वस्तीत पाणी शिरले आहे. 

काही टपऱ्या, वाहनं पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची माहिती मिळत आहे. काही भागांचा शहराशी तुटला संपर्क आहे. त्यातच वीज पुरवठा खंडीत झाल्याने मदत कार्यात अडचणी येत निर्माण होत आहेत.

काही तरुणांनी जीव धोक्यात घालून नागरिकांना पुराच्या पाण्यातून बाहेर काढून सुरक्षित स्थळी हलविले. या पावसात कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी अनेकांच्या संसारोपयोगी वस्तू वाहून गेल्या. 

  

शुक्रवारी रात्री मनमाड परिसरात झालेल्या पावसाने कांद्याच्या शेतात पाणीच पाणी झाले. पाण्यात सतत कांदयाचे मूळ भिजल्याने कांदा पूर्णत खराब झाला असून शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली आहे. सरकारने नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.