काँग्रेसच्या तक्रारीनंतर पेट्रोल पंपांवरील पंतप्रधान मोदींचे बॅनर हटणार

काँग्रेसच्या तक्रारीनंतर राज्यातील पेट्रोल पंपांवर लागलेले पंतप्रधान नरेंद्र मोदींचे बॅनर्स हटवले जाणार आहेत.

Updated: Sep 25, 2019, 01:30 PM IST
काँग्रेसच्या तक्रारीनंतर पेट्रोल पंपांवरील पंतप्रधान मोदींचे बॅनर हटणार title=

मुंबई : पेट्रोल पंपांवर लागलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बॅनरवरून विरोधक टीका करत होते. यासंदर्भात काँग्रेस पक्षातर्फे निवडणूक आयोगाकडे अधिकृत तक्रारही दाखल करण्यात आली होती. या तक्रारींची दखल घेत हे बॅनर हटवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. काँग्रेसच्या तक्रारीनंतर राज्यातील पेट्रोल पंपांवर लागलेले पंतप्रधान नरेंद्र मोदींचे बॅनर्स हटवले जाणार आहेत.

एसटी-बस स्थानके, रेल्वे स्थानके एसटी आणि महापालिकांच्या बसेसवरील राज्य शासनाच्या जाहीराती हटवल्या जाणार आहेत. काँग्रेसच्या तक्रारीनंतर निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे.

त्यामुळे बॅनर्स आणि जाहिरात काढण्यासंदर्भात राज्यातील सर्व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना लेखी सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार ही कार्यवाही होणार आहे.