मोदींच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचा भूमीपूजन सोहळा

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा भूमीपूजन सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी मुंबईत संपन्न झाला.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Feb 18, 2018, 06:34 PM IST
मोदींच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचा भूमीपूजन सोहळा title=

नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा भूमीपूजन सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी मुंबईत संपन्न झाला. मोदींच्या भाषणाची सुरुवात मराठीतून झाली. यावेळी बोलताना लटकना, अटकना, पटकना हे जुन्या सरकारचं धोरण असल्याचं सांगत, नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला. 

नागरी उड्डयन धोरण यशस्वीपणे राबवलं-पीएम

आमच्या सरकारनं देशात नागरी उड्डयन धोरण यशस्वीपणे राबवल्याचं मोदींनी यावेळी सांगितलं. नवी मुंबईचं विमानतळ हे देशातलं सर्वात मोठं ग्रीनफिल्ड विमानतळ असणार असल्याचं मोदी म्हणाले. त्याचवेळी शिवस्मारक तसंच मुंबईतल्या इतरही प्रकल्पांचा संदर्भ देत, 2022 पर्यंत मुंबईचं रुप पालटणार असल्याचा विश्वासही मोदींनी बोलून दाखवला. 

नितीन गडकरींविषयी गौरवोद्गार

तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या नेतृत्वात पॉवर सेक्टरला चालना मिळाल्याचे गौरवोद्गारही त्यांनी या निमित्तानं काढले. तर सिगापूर बंदराचं लोकार्पण करताना, छत्रपती शिवाजी महाराजांचा दाखला देत समुद्री मार्गाची ताकद वाढवण्याची गरजही मोदींनी व्यक्त केली. देशाला लाभलेला साडेसात हजार किलोमीटर लांबीच्या किना-याचा सर्वंकष लाभ घेण्याची आवश्यकता त्यांनी यावेळी बोलून दाखवली.