पिंपरी-चिंचवड : पिंपरीमध्ये एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. गुंडांच्या टोळक्याने एका तरुणाला बेदम मारहाण केली आहे. इतकंच नाही तर त्याला कुत्र्यासारखी बिस्किटं खायला लावली
नेमका प्रकार काय?
पिंपरी-चिंचवडमध्ये गुन्हेगारीचं प्रमाण प्रचंड वाढलं आहे. गुंडांना कायद्याचा धाक राहिला आहे की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. याचं कारण आहे पिंपरी-चिंचवडमध्ये घडलेली संतापजनक घटना.
केवळ आपल्याला भाई म्हटलं नाही म्हणून टोळक्याने एका तरुणाला बेदम मारहाण केली. पिंपरी-चिंचवडच्या थेरगाव परिसरात हा धक्कादायक प्रकार घडलाय. रोहन वाघमारे याला भाई म्हंटलं नाही म्हणून त्यानं आपल्या साथीदारांच्या मदतीनं पीडित मुलाला बेदम मारहाण केली. तसच कुत्र्याप्रमाणे बिस्किटं खायला लावली.
मारहाण करतानाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून स्थानिकांनी या घटनेवर संताप व्यक्त केला आहे. या प्रकरणी पीडित मुलानं आरोपी रोहन वाघमारेविरोधात तक्रार दाखल केलीय. वाकड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.