आशिष अम्बाडे, झी २४ तास, चंद्रपूर : महाराष्ट्रातील काँग्रेसचे एकमेव खासदार बाळू धानोरकर यांना कैद्यांना भेटण्यासाठी हिटलरची परवानगी हवी आहे. आता त्यांच्यासाठी हिटलर कोण आहे? हे त्यांनी कैद्यांसोबत जाहीर कार्यक्रमात बोलताना कबूल केलं आहे. अखेर खासदारांसाठी देखील एक हिटलर आहे आणि ते त्यांना घाबरतात हे देखील खूप महत्त्वाचं आहे.
बायको घरी ''हिटलर''च असते, खासदार धानोरकरांची आमदार बायकोसमोर फटकेबाजी , चंद्रपुरातल्या एका कार्यक्रमात खासदारांनी आपल्या आमदार पत्नीला भर कार्यक्रमात दिली हिटलरची उपमा, घरी गेल्यावर हे जेलर नव्हे, तर कुणी वेगळेच जेलर असतात अशी कारागृहातील कार्यक्रमात कोटी केली.
महाराष्ट्रातील काँग्रेसचे एकमेव खासदार बाळू धानोरकर यांनी आज एका कार्यक्रमात त्यांची आमदार पत्नी प्रतिभा धानोरकर यांना हिटलरची उपमा दिली. या विनोदी टोल्यामुळे कार्यक्रमस्थळी काही मिनिट खसखस पिकली. कैद्यांच्या मनोरंजनासाठी खासदार बाळू धानोरकर यांनी जिल्हा कारागृहाला दोन टी.व्ही संच भेट दिले.
जेव्हा आमची हिटलर मॅडम आम्हाला परवानगी देईल
कारागृहातील कैद्यांशी संवाद साधतांना " चंद्रपुरात स्थायिक व्हावं अशी माझी इच्छा आहे. तसं झालं तर तुम्हाला महिन्यातून किमान एकदा भेटता येईल. तुमच्या समस्या समजून घेता येईल. मात्र हे तेव्हाच शक्य आहे, जेव्हा आमची हिटलर मॅडम आम्हाला परवानगी देईल".
पुढे बोलताना धानोरकर यांनी "बायको घरी हिटलरच असते. ज्याची परिस्थिती त्यांनाच ठाऊक असते अशी मिश्किली केली. तुम्ही इकडे आहात (कारागृहात) बरे आहात. घरी असते तर तुमचीही परिस्थिती फार वेगळी नसती.
''जिसको बिवी है उसको पता है. जिसको नही है, उसका ठिक है'', असे म्हणतात एकच हशा पिकला. कारागृहात जेलर आहेत. घरी गेल्यावर जेलर नसतात. तिथले जेलर कुणी वेगळेच असतात, असेही ते म्हणाले.