मद्यधुंद तरुणानं रिव्हर्समध्ये पळवली गाडी, पाहा थरकाप उडवणारा अपघाताचा व्हिडीओ

मद्यधुंद तरुणानं रिव्हर्समध्ये पळवली गाडी, अंगावर काटा आणणारा अपघाताचा व्हिडीओ

Updated: Jan 14, 2022, 09:53 PM IST
मद्यधुंद तरुणानं रिव्हर्समध्ये पळवली गाडी, पाहा थरकाप उडवणारा अपघाताचा व्हिडीओ title=

पिंपरी-चिंचवड : अंगावर काटा आणणारा अपघाताचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. रिव्हर्समध्ये गाडी पळवताना भीषण अपघात झाला आहे. या गाडीनं काही लोकांना चिरडल्याचं दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार कार चालक मद्यधुंद अवस्थेत होता अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे. 

गा़डी रिव्हर्समध्ये घेताना चालकाचं नियंत्रण सुटलं आणि वेग वाढला. गाडीने तिथे असलेल्या हातगाड्यांनाही जोरदार धडक दिली. त्यावेळी तिथे जास्त लोक नव्हते. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. मात्र या घटनेत काही एक महिला जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. 

जखमी महिलेला सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. हा व्हिडीओ 13 जानेवारीचा असल्याची माहिती मिळाली आहे. या अपघाताची माहिती पोलिसांना देण्यात आली असून सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस तपास करत आहेत. हा व्हिडीओ पिंपरी चिंचवड परिसरातील असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.