मुंबई : भारतामध्ये कोरोनाचे १६८ रुग्ण पॉझिटीव्ह आढळले आहेत. कोरोनामुक्त भारतासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज यासंदर्भात जनतेशी संवाद साधणार आहेत. पण असे सर्व सुरु असताना केंद्राच्या दिव्या खालीच अंधार असल्याचे दिसून आले आहे.
#WATCH Union Minister of State for Health and Family Welfare Ashwini Kumar Choubey: People should spend at least 15 minutes in the sun. The sunlight provides Vitamin D, improves immunity and also kills such (#Coronavirus) viruses. pic.twitter.com/F80PX6VOmy
— ANI (@ANI) March 19, 2020
केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री अश्वीनी कुमार चौबे यांनी कोरोनापासून मुक्त होण्यासाठी अजब सल्ला सांगितला आहे. यामुळे सोशल मीडियामध्ये ते सध्या टीकेचे धनी झाले आहेत.
उन्हात १५ मिनीट उभे रहा, उष्णतेमुळे शरीरातील कोरोना वायरस नष्ट होईल असा शोध केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री अश्वीनी कुमार चौबे यांनी लावला आहे. पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी हे बेजबाबदार विधान केले आहे. जगभरात कोरोना हा विषय गांभीर्याने घेतला जातोय. यावरच्या उपाययोजना खबरदारीनं घेण्याच्या सुचना देण्यात येत आहेत. पण केंद्रीय आरोग्य राज्यमंत्र्यांने असा शोध लावण हा गंभीर प्रकार आहे.
११ ते २ दरम्यान उनं जास्त असतं. या उन्हात स्वत:ला १० ते १५ मिनिटं शेकवल्यास शरीराला फायदा होईल. यातून व्हिटॅमन डी मिळेल. यातून व्हायरस समाप्त होईल.