सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे पर्यटकांची कोकणातील समुद्रकिनाऱ्यांवर गर्दी

नाताळच्या सुटीला लागून आलेल्या विकेंन्डमुळे पर्यटक मोठया प्रमाणावर रायगडकडे वळले आहेत. त्याचमुळे रायगडच्या अलिबाग, मुरूड, काशीद, दिवेआगर या समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांची गर्दी झालीय.

Updated: Dec 23, 2017, 07:38 PM IST
सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे पर्यटकांची कोकणातील समुद्रकिनाऱ्यांवर गर्दी title=

रायगड : नाताळच्या सुटीला लागून आलेल्या विकेंन्डमुळे पर्यटक मोठया प्रमाणावर रायगडकडे वळले आहेत. त्याचमुळे रायगडच्या अलिबाग, मुरूड, काशीद, दिवेआगर या समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांची गर्दी झालीय.

लहान मुलांच्या शाळेच्या सहलीही कोकणात येत आहेत. रायगडात येणारे पर्यटक जसे समुद्रमार्गे मुंबईहून येत असतात तसेच महामार्गावरूनही मोठया प्रमाणावर येत आहेत.

पर्यटक मोठ्या प्रमाणात कोकणात येत असल्याने मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूकीची कोंडी झाली आहे. खारपाडा पूल ते पेण दरम्यान वाहनांच्या मोठमोठया रांगा लागल्या आहेत. 

यामुळे पर्यटकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. महामार्गाची दुरूस्ती बऱ्यापैकी झाली असली तरी बेशिस्त वाहनचालकांमुळे कोंडीला सामोरे जावे लागत आहे.

सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे पर्यटकांची कोकणातील समुद्रकिनाऱ्यांवर गर्दी