सागर आव्हाड, झी मीडिया
Pune News Today: सहकुटुंब कोल्हापुरला निघाले होते. वाटेत सर्व पुणे स्थानकावर उतरले मात्र त्यांचा मुलगा रेल्वेच्या डब्ब्यातच राहिला. (Pune Station) प्लॅटफॉर्मवर उतरलेल्या त्याच्या आई-वडिलांना उशीराने ही बाब लक्षात आल्यावर त्यांचे धाबे दणाणले. कुटुंबीयांनी तातडीने स्टेशन मास्तरांना गाठले. त्यांच्या प्रयत्नांमुळं गाडीत राहिलेला मुलगा त्याच्या आई-वडिलांना भेटला आहे. (Pune Boy Lost In Train)
आई-वडिलांबरोबर महालक्ष्मी एक्सप्रेसने (Mahalaxmi Express) प्रवास करणाऱ्या मुलाला तिकीट चेकरने कोल्हापूर या ठिकाणी आई-वडिलांच्या स्वाधीन केलं आहे. त्याचं घडलं असं की, एक लहान मुलगा आई-वडिलांबरोबर महालक्ष्मी एक्सप्रेसने प्रवास करत होता. मात्र ट्रेन पुण्याला येताच त्याचे आई-वडिल प्लॅटफॉर्मवर उतरले. आई-वडिलांकडे जनरल तिकीट होतं. पण तरीही हे सर्वजण स्लीपर कोचमध्ये बसले होते.
पुणे स्टेशनवर गाडी आली तेव्हा टीसीच्या भीतीपोटी सर्व कुटुंबीय प्लॅटफॉर्मवर उतरले. मात्र त्यांचा मुलगा मात्र स्लीपर कोचच्या डब्यातच राहिला. प्लॅटफॉर्मवर उतरल्यावर त्यांना आपल्यासोबत मुलगा नाहीये हे लक्षात आले. मुलगा गाडीतच राहिल्याचे लक्षात येताच त्यांच्या काळजाचा ठोकाच चुकला. त्यांना चूक लक्षात येताच मुलाच्या आई-वडिलांनी स्टेशनवर असणारे तिकीट चेकर तिवारी यांच्याकडे धाव घेतली.
तिवारी यांनी महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये ड्युटी करत असणाऱ्या तिकीट चेकरला संपर्क साधला. व मुलाला शोधण्यास सांगितले. तेथील तिकीट चेक करने गाडीची तपासणी केली. तेव्हा सदर मुलगा स्लीपर कोचमध्ये झोपलेला होता. तिकीट चेकरने कोल्हापूर स्टेशनवर गाडीने थांबा घेतल्यानंतर तिथे डयुटीवर असलेल्या स्टेशन मास्तराकडे सोपवले. व याची माहिती पुण्यातील तिकीट चेकर तिवारी यांना माहिती दिली. मुलाची माहिती मिळतात आई-वडिलांना कोल्हापूरला जाणाऱ्या रेल्वेमध्ये बसवून देण्यात आलं. स्टेशन मास्तर तिवारी यांच्या प्रसंगावधानतेमुळं गाडीत राहिलेला मुलगा आई-वडिलांना सापडला आहे. त्यांनी दोघांचेही आभार मानले आहे.
संतमंडळीच्या पालख्या सध्या पुण्यात मुक्कामी असल्याने त्याचा शहरातील वाहतुकीवर थेट परिणाम होणार आहेत. नागरिकांना दरम्यानच्या काळात पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. यंदाच्या वर्षी लाईव्ह लोकेशनच्या माध्यमातून नागरिकांना पालखी सोहळ्याची माहिती मिळणार आहे. शिवाय वाहतुकीचं नियोजन करणंही शक्य होणार आहे. पुण्यात येताच या पालखी मार्गांवर कोणताही अनुचित प्रकार न होऊ देण्यासाठी यंत्रणांची नजर असणार आहे. यासाठी CCTV आणि ड्रोनचा वापर पोलीस यंत्रणा करणार आहे.