पनवेल महापौर निवडणूक, भाजप-शेकापकडून उमेदवार जाहीर

रायगड जिल्ह्यातील पहिली महानगर पालिका असणाऱ्या पनवेल महानगर पालिकेच्या निवडणुकीनंतर सर्वांच्याच नजरा महापौर पदासाठी कोणाचे नाव घोषित होते याकडे लागल्या होत्या. भाजपकडून दोन नावे जाहीर करण्यात आली आहेत.

Updated: Jul 7, 2017, 08:28 AM IST
पनवेल महापौर निवडणूक, भाजप-शेकापकडून उमेदवार जाहीर title=

पनवेल : रायगड जिल्ह्यातील पहिली महानगर पालिका असणाऱ्या पनवेल महानगर पालिकेच्या निवडणुकीनंतर सर्वांच्याच नजरा महापौर पदासाठी कोणाचे नाव घोषित होते याकडे लागल्या होत्या. भाजपकडून दोन नावे जाहीर करण्यात आली आहेत.

महापौर पदासाठी भाजपकडून डॉ. कविता चौतमोल आणि उपमहापौर पदासाठी चारुशीला घरत यांनी अर्ज भरले तर शेकाप आघाडीकडून महापौर पदासाठी हेमलता गोवारी आणि उपमहापौर पदासाठी रवींद्र भगत यांनी अर्ज भरला. 

१० जुलैला येथील वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात महापौर पदाची निवडणूक होणार आहे. निवडणुकीत मतदारांनी भाजपाला स्पष्ट बहुमत दिल्याने भाजपचाच महापौर बसणार आहे.