पंकज भुजबळांच्या प्रचारासाठी पत्नीची कांदा लागवड

पंकज भुजबळ यांच्या प्रचारार्थ त्यांच्या पत्नी विशाखा भुजबळही पुढे सरसावल्या

Updated: Oct 7, 2019, 12:01 PM IST
पंकज भुजबळांच्या प्रचारासाठी पत्नीची कांदा लागवड  title=
संग्रहित फोटो

नाशिक : विधानसभा निवडणूक म्हटली की नेते मतदारापर्यंत पोहचण्यासाठी वेगवेगळ्या क्लुप्त्या लढवतात. विधानसभा निवडणूक प्रचाराला सुरवात झाली आहे. नांदगाव मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार विद्यमान आमदार पंकज भुजबळ यांच्या प्रचारार्थ त्यांच्या पत्नी विशाखा भुजबळही पुढे सरसावल्या आहे. मतदारांच्या गाठीभेटी घेण्यासाठी मतदार संघ पिंजून काढत आहे. 

यावर्षी चांगला पाऊस झाल्याने शेतकरी शेतीच्या कामात व्यस्त आहे. प्रचार दौऱ्यावर असलेल्या आमदार पत्नी मतांचा जोगवा मागण्यासाठी थेट शेताच्या बांधावर गेल्या. एवढ्यावरच त्या थांबल्या नाही तर, त्यांनी चक्क शेतात कांदे लागवड करणाऱ्या महिलांबरोबर शेतात कांद्याची लागवड केली. महिलांशी संवाद साधला.

आमदारच्या पत्नी शेतात येऊन कांदे लावत असल्याने, कांदे लागवड करणाऱ्या महिलांना अप्रूप वाटप होते.