योगेश खरे, झी मीडिया. नाशिक : राज्यात कोरोना संसर्गाचं थैमान सुरू आहे. राज्य सरकार ब्रेक द चैन मोहिमे अंतर्गत कोरोनाला आळा घालण्यासाठी प्रयत्न करीत आहे. अशातच अनेक जिल्ह्यांमध्ये गंभीर कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजनचा तुटवडा जाणवू लागला आहे. ऑक्सिजनचा तुटवड्याच्या कारणावरून नाशिकमधील पाच रुग्णालयांनी रुग्णाच्या नातेवाईकांना रुग्णांना परत घेऊन जाण्याचे सांगितले आहे.
नाशिक शहरात काल पालिकेच्या रुग्णालयात ऑक्सिजन सिलेंडर लिक झाल्यामुळे 22 रुग्णांना नाहक आपला जीव गमवावा लागला. आजही नाशिकातील पाच रुग्णालयातील ऑक्सिजन संपण्याच्या मार्गावर आहे. रुग्णालयांनी त्यांच्या रुग्णांच्या नातेवाईकांना संपर्क करून रुग्णांना दुपारपर्यंत दुसरीकडे हलवण्याविषयी विनंती केली आहे.
ऑक्सिजन सिलेंडर लिकच्या कालच्या घटनेनंतर आपल्या रुग्णालयात अशा काही घटना घडू नये. आणि नातेवाईकांचा रोष ओढवून घेऊ नये म्हणून रुग्णालयांनी 12 वाजेपर्यंत आपले रुग्ण दुसरीकडे नेण्याचा सल्ला दिला आहे.
शहरातील लिक्विड ऑक्सिजनचा पुरवठ्यात विलंब होत आहे. त्यामुळे रुग्णांचे मृत्यू होऊ नयेत म्हणू रुग्णायांनी जबाबदारी झटकल्याचे दिसून येत आहे.