वीज बिलासंदर्भात सरकारने दिलासा न दिल्याने राज्यभरातून संताप

 वाढीव वीज बिलासंदर्भात (electricity bills) कुठलाही दिलासा न दिल्याने राज्यभरातून संताप व्यक्त होत आहे.

Updated: Nov 18, 2020, 08:47 PM IST
वीज बिलासंदर्भात सरकारने दिलासा न दिल्याने राज्यभरातून संताप  title=

मुंबई : ऊर्जामंत्री नितीन राऊत ( Nitin Raut ) यांनी वाढीव वीज बिलासंदर्भात (electricity bills) कुठलाही दिलासा न दिल्यानं राज्यभरातून संताप व्यक्त होतोय. 'झी २४ तास'ने महाराष्ट्रभरातून (Maharashtra) सामान्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. वीज ग्राहकांनी संतप्त प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. जिथं खाण्याची भ्रांत आहे तिथं वाढीव वीज बिलं कशी आणि कुठून भरणार असा संतप्त सवाल केला जात आहे.

सरकारच्या भूमिकेवर (Maharashtra government) विरोधकांनीही जोरदार टीकास्त्र सोडले आहे. सध्याच्या सरकारमध्ये निर्णय क्षमता नसल्याची प्रतिक्रिया मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी केलाय तर नितीन राऊत यांनी याआधी केलेल्या घोषणा म्हणजे लबाडाघरचं जेवण ठरले आहे, अशी टीका भाजप आमदार शेलार यांनी केली आहे. सरकारने सक्तीने वसूल केल्यास तीव्र पडसाद उमटतील, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला आहे. तसेच मनसेनेही याबाबत आवाज उठविण्याचा निर्णय घेतला आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सांगितले.

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करू असं वारंवार सरकारकडून सांगण्यात आलं मात्र आजपर्यंत शेतकऱ्यांना मदत मिळालीच नाही दिवाळीसारखा सण अंधारात गेलाय यंदाची दिवाळी कडू झाली. सरकारने बोलघेवडेपणा बंद करून तात्काळ शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी मागणी शेतकरी करत आहेत. सामान्यांना सरासरी तीन महिन्यांची बिले दिली गेली. मात्र, काहींनी बिल भरुनही भरमसाठी बिले आहेत. काहींना ५० हजार रुपयांच्या घरात बिले आल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.