वर्धा शासकीय विश्रामगृहात खुलेआम दारू पार्टी, चार जणांवर कारवाई

चार जणांवर शहर पोलिसांनी कारवाई

Updated: Jul 8, 2019, 04:45 PM IST
वर्धा शासकीय विश्रामगृहात खुलेआम दारू पार्टी, चार जणांवर कारवाई title=

वर्धा : वर्ध्याच्या शासकीय विश्रामगृहात खुलेआम दारूपार्टी करणाऱ्या चार जणांवर शहर पोलिसांनी कारवाई केली आहे. दारूबंदी असलेल्या गांधी जिल्हयातील सेवा निवृत्त अधिकारी आणि विश्रामगृह चालक दारूची पार्टी करत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे पोलीस चमू शासकीय विश्रामगृहात पोहचले असता त्यांना दारू पार्टी सुरू असल्याचं आढळून आलं.

विशेष म्हणजे विश्रामगृह चालक अनिल जगताप यांनी दारू पार्टी करण्याकरीता खोली उपलब्ध करून दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.