Onion Farmer Couple Become Police : शेतकरी कष्टकरी असं म्हटलं जातं. शेती माला भाव न मिळणे किंवा निसर्गाची मार यामुळे अनेक वेळा शेतकरी त्रस्त असतो. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील शेतकऱ्याला अवकाळी पावसाने नाकीनऊ आलं आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरवल्यामुळे त्याचा डोळ्यात अश्रू आहे. अशातच एका शेतकरी जोडप्याचा आयुष्याला कटालणी देणारी घटना घडली आहे.
ही कहाणी आहे कष्ट करणाऱ्या नवऱ्या बायकोची (Success Story)...लग्नात आपण एकमेकांना वचन देतो प्रत्येक संकटात, सुख दु:खात एकमेकांची साथ देणार. या जोडप्याने ही शपथ पूर्ण केली आहे. या शेतकरी जोडप्याने अहोरात्र त्यांचा ध्येयसाठी कष्ट केले. शेतीत कांदा काढता (Onion Farmer) काढताच या दोघांचे नशीब पलटले. या दोघांनी एकत्र पोलीस भरती (Police Bharati) परीक्षा दिली होती. शेतात कांदा काढणी करत असतानाच भरतीची शेवटची लिस्ट जाहीर झाली आणि या दोघांचे स्वप्न साकार (Husband wife pass police exam) झाले.
पुण्यातील शिरूरमधील चांडोह इथले तुषार शेलार आणि भाग्यश्री शेलार यांची अख्खा गावात चर्चा होते आहे. तुषार गेल्या चार वर्षांपासून पोलीस भरतीसाठी प्रयत्न करत होता. नवऱ्याला साथ म्हणून भाग्यश्रीनेही पोलीस होण्याचं स्वप्न बाळगलं. पोलीस भरतीसाठी अभ्यास करत असताना त्यांनी कुटुंबाचीही जबाबदारी आपल्या खांद्यांवर उचलली.
अभ्यास करता करता दोघेही शेतात काम करत होती. पोलीस भरती परीक्षेत (Police Couple) दोघांनी एकत्र परीक्षा दिली. आता वाट होती ती निकालाची, पहिली लिस्ट लागली पण त्यात काय या दोघांचे नाव नाही. वाट पाहणं सुरु होतं आणि शेतात काम करणंही...
एके दिवशी शेतात कांदा काढत असताना त्यांचं नशीब पलटलं...पोलीस भरतीची शेवटची लिस्ट जाहीर झाली. अन् क्षणात दोघांचे स्वप्न एकत्र साकारल झाले. या बातमीनंतर दोघांच्या आनंदाला पारा उरला नाही. आनंदाच्या उत्साहात तुषारने पत्नीला चक्क उचलून घेतलं.
त्यांचं हे श्रेय पाहून कुटुंबातील सदस्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू पहायला मिळाले. विशेष म्हणजे शेलार कुटुंबाचा गावातील सामाजिक विकासात मोलाचा वाटा आहे. भाग्यश्री यांची सासू गेल्या पाच वर्षांपासून गावाचा विकासासाठी झटत आहे. 2020 मध्ये तुषार आणि भाग्यश्रीचं लग्न झालं होतं. तेव्हापासून या दोघांनी पोलीस होण्याचं स्वप्न उराशी बाळगलं होतं. आज त्यांचा कष्टाचं सोनं झालं आहे. या शेतकरी जोडप्याची यशोगाथा ही प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे.