तुषार तपासे, झी मीडिया, सातारा : साताऱ्यात एक विचित्र आणि धक्कादायक घटना घडली आहे. पिस्तुलचे कव्हर खरेदी विपरीत काहीतरी घडले. यावेळी अचानक बंदूकमधून गोळी सुटली. यात सेल्समन जखमी झाला आहे. सातारा पोलिस या प्रकरणी तपास करत आहेत (Satara Crime News).
साताऱ्यातील शेंद्रे येथे एका शॉपिंग मॉलमध्ये हा प्रकार घडला आहे. एक व्यक्ती येथे पिस्तुलचे खरेदी करण्यासाठी आला होता. यावेळी पिस्तुलाच्या कव्हर मध्ये बंदूक ठेवत असताना गोळी सुटली. या घटनेत दुकानात काम करणाऱ्या सेल्समन जखमी झाला आहे.
यामध्ये सेल्समन पायाला गोळी लागून तो जखमी झाला आहे. खाजगी रुग्णालयात त्याला उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या मॉलमध्ये पिस्तूल साठी लेदर पाकीट खरेदी करत असताना ही घटना घडल्याचे पोलिसांचे सांगितले आहे. सातारा तालुका पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या घटनेची माहिती घेत पोलिसांनी तपास सुरु केला आहे.
सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील तडवळे गावात घरात बांधलेल्या झोक्याचा फास लागून नऊ वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला आहे. पोर्णिमा फाळके असे मृत मुलीचे नाव आहे. घरातच मुलीला खेळण्यासाठी झोका बांधण्यात आला होता. हाच झोका मुलीच्या मृत्यूचे कारण ठरले आहे.