Koregaon Bhima: वाहतुकीत बदल, नवीन वर्षात या मार्गावर प्रवास करत असाल तर अधिक जाणून घ्या

काही दिवसांनीच आपण 2023 मध्ये (New Year 2023) पदार्पण करतो आहोत. नवीन वर्षांपासून नवे बदलही सुरू होतात. असाच एक बदल तुमच्या प्रवासातही होणार आहे. तुम्ही जर का पुणे - अहमदनगर (Pune - Ahemdnagar) मार्गे प्रवास करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे.

Updated: Dec 28, 2022, 04:56 PM IST
Koregaon Bhima: वाहतुकीत बदल, नवीन वर्षात या मार्गावर प्रवास करत असाल तर अधिक जाणून घ्या  title=
pune news

हेमंत चापुडे, झी मीडिया,पुणे: काही दिवसांनीच आपण 2023 मध्ये (New Year 2023) पदार्पण करतो आहोत. नवीन वर्षांपासून नवे बदलही सुरू होतात. असाच एक बदल तुमच्या प्रवासातही होणार आहे. तुम्ही जर का पुणे - अहमदनगर (Pune - Ahemdnagar) मार्गे प्रवास करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. कारण या मार्गावर आता तुम्हाला वेगळा बदल पाहायला मिळणार आहे. कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभ अभिवादन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे-अहमदनगर महामार्गावरील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. पुणे-अहमदनगर महामार्ग क्रमांक 60 वरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी 31 डिसेंबर 2022 रोजी सायंकाळी 5 वाजल्यापासून ते 1 जानेवारी 2023 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत बंद करुन पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी निर्गमित केले आहेत. शिक्रापूर ते चाकण अशी जाणारी-येणारी सर्व प्रकारची वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे.अहमदनगरकडून पुणे, मुंबईकडे (Mumbai Pune) येणारी जड वाहने शिरुर, न्हावरा फाटा, न्हावरा, पारगाव, चौफुला, यवत, सोलापूर रोड मार्गे पुण्याकडे येतील. (on the occasion of shorya din new changes may accour in pune ahemdnagar highway) 

काय असेल नवा बदल? 

पुण्याहून अहमदनगरकडे जाणारी जड वाहने ही पुणे- सोलापूर (Solapur) महामार्गाने चौफुला, केडगाव मार्गे, न्हावरा, शिरूर, अहमदनगर रोड अशी जातील. मुंबईकडून अहमदनगरकडे जाणारी जड वाहने, माल वाहतूक (ट्रक/टेम्पो) ही वडगांव मावळ, चाकण, खेड, मंचर, नारायणगाव, आळेफाटा मार्गे अहमदनगरकडे जातील तसेच हलकी वाहने कार, जीप आदी वडगाव मावळ, चाकण, खेड, पाबळ, शिरूर मार्गे अहमदनगरकडे जातील. विजयस्तंभ अभिवादन सोहळ्याच्यावेळी नागरिकांनी या पर्यायी मार्गाचा वापर करुन प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी केले आहे.

समृद्धीवर अपघातांची मालिका सुरूच

समृद्धी महामार्गावरील (Samruddhi Mahamarg) अपघात रोखण्यासाठी आता अपघातांचे ब्लॅक स्पॉट शोधण्यात येणार आहे. नागपूर ते शिर्डी (Shirdi)  हा समृद्धी महामार्ग खुलाहून अवघ्या पंधरा दिवसांचा कालावधी उलटलाय, यादरम्यान एकट्या संभाजीनगर (Sambhajinagar) जालना जिल्हा सह जालना जवळील सिंदखेड राजा मार्गाचा विचार केल्यास 28 पेक्षा जास्त लहान मोठ्या अपघात घडले आहे, त्यामुळे रस्ते विकास महामंडळ सतर्क झालं असून हे अपघात रोखण्यासाठी धोकादायक वळण तसेच ब्लॅक स्पॉट (Black Spot) अंतिम करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. सोबतच समृद्धी महामार्गावर ताशी 120 किलोमीटर वेग मर्यादा निश्चित करण्यात आली आहे आता तिचं पालन होत आहे की नाही हे सुद्धा पाहण्यात येणार आहे आणि त्यानुसार कारवाईसुद्धा होऊ शकणार आहे.