मंगलाष्टकं म्हणणारे हे तानसेन काका का होतायत इतके व्हायरल

इतक्या ताना तर गायकही घेत नसेल... 

Updated: Nov 19, 2021, 12:06 PM IST
मंगलाष्टकं म्हणणारे हे तानसेन काका का होतायत इतके व्हायरल title=

Wedding News : लग्न म्हटलं की, अनेक प्रसंग आलेच. पण या लग्नात नववधु आणि नववरासोबत आणखी एक व्यक्ती खास असते. ते म्हणजे मंगलाष्टक बोलणारी व्यक्ती भटजी. लग्नात कायमच नव दाम्पत्य चर्चेत असतात. पण भटजींचा लग्नांमधील थाट थोडा निराळाच असतो. 

अशाच एका भटजींचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यामध्ये भटजी हटके स्टाईलमध्ये मंगलाष्टक म्हणत आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगला व्हायरल झाला आहे. भटजींचा लग्नात उपस्थित असलेल्या तरूणांनी हा व्हिडीओ तयार केला आहे. यामध्ये भटजी अगदी ताणा देत मंगलाष्टक गात आहेत. 

इंटरनेटवर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये, स्टेजवर लग्नाचे आयोजन केले जात आहे. शेकडो पाहुणे समोर बसलेले दिसत आहेत. वधू-वरही मंचावर उपस्थित असतात. तेवढ्यात एक म्हातारी व्यक्ती स्टेजवर उभे राहतात आणि मस्तीने मंगलाष्टक म्हणत आहे.  गाणे म्हणत असताना ते आजोबा असे हावभाव करत आहे. ज्यामुळे सगळ्यांना हसू येत आहेत. 

त्याच वेळी, वधू आणि वर मंचावर त्यांचे विधी करत आहेत. आजोबांचे हे कृत्य पाहून समोर उपस्थित पाहुणे खूप हसायला लागले. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ महाराष्ट्रातील असून कोणत्या भागातील आहे हे अद्याप कळलेला नाही. 

सोशल मीडियावर लोक या व्हिडिओला खूप पसंत करत आहेत. athvanitil videos Officers नावाच्या अकाऊंटने हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर अपलोड करताच लोकांना तो खूप आवडला. हा व्हिडिओ शेअर करताना फनी व्हिडिओ आणि फनी मॅरेज या कॅप्शनमध्ये दोन हॅशटॅग वापरण्यात आले आहेत. हा व्हिडीओ पाहून महाराष्ट्रातील काही ग्रामीण भागात लग्नाचे आयोजन केले जात असल्याचे समजते.