राज्यात पुन्हा पावसाची शक्यता, या भागात मेघगर्जनेसह पाऊस

 Rain in Maharashtra : राज्यात पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता आहे. मेघगर्जनेसह राज्याच्या विविध भागात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. 

Updated: Nov 19, 2021, 11:32 AM IST
राज्यात पुन्हा पावसाची शक्यता, या भागात मेघगर्जनेसह पाऊस title=
संग्रहित छाया

मुंबई : Rain in Maharashtra : राज्यात पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता आहे. मेघगर्जनेसह राज्याच्या विविध भागात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. काही ठिकाणी हलक्या सरींचीही शक्यता आहे. 22 नोव्हेंबरपर्यंत राज्यात पाऊस सक्रीय होण्याचा इशारा भारतीय हवामान विभागाने (Meteorological Department) दिला आहे. दरम्यान, गेले दोन दिवस राज्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला. कोकण भागाज चांगला पाऊस झाला. तर मुंबईत तुरळ पाऊस पाहायला मिळाला. (IMD Predicts Heavy Rains Over Parts of Maharashtra For Next 3 Days)

ऑक्टोबरमहिन्यात काही दिवस पाऊस पडला होता. यावेळी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. आता नोव्हेंबर महिना संपायला आला तरी अजून राज्यात थंडीची चाहूल लागलेली नाही. सातत्याने निर्माण होत असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे गेल्या काही दिवसांपासून राज्यात अवकाळी पाऊस कोसळत आहे. 22 नोव्हेंबरपर्यंत राज्यात विविध भागात मेघगर्जनेसह पाऊस कोसळेल, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात आज तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होईल. तर 20 ते 22 नोव्हेंबरला कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट पाऊस होईल, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.