Nagpur | कुख्यात गुंड गमछु उर्फ महेश लांबटला संपवलं

हत्येचा थरारक व्हीडिओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात (CCTV) कैद झाला आहे. 

Updated: Sep 15, 2021, 11:05 PM IST
Nagpur | कुख्यात गुंड गमछु उर्फ महेश लांबटला संपवलं title=

अमर काणे, झी 24 तास, नागपूर : कुख्यात गुंड गमछु उर्फ महेश लांबटची (Gamchu aka Mahesh Lambat)  जुनी शुक्रवारी परिसरात निघृणपणे हत्या करण्यात आली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. लभानतांडा परिसरात रात्री साडे आठ ते नउच्या दरम्यान ही हत्या करण्यात आली. एकूण 4-5 जणांनी धारधार शस्त्रांच्या मदतीने हत्या करण्यात आली. सुभाष शाहू हा क्रिकेट बूकी (Cricket Bookie) होता. याचा काही वर्षांपूर्वी खून करण्यात आला. गमछूच्या मागे हे मारेकरी हत्यार घेऊन पळत होते. हत्येचा थराराक व्हीडिओ सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यात कैद झाला आहे. (Notorious goon Gamchu aka Mahesh Lambat murdered in Nagpur) 

असा रंगला थरार 

गमछुची मारेकरी पाठलाग करताना सीसीटीव्हीत चित्रित झाले आहे. लभानतांडा परिसरात गमछुला मारण्यासाटी मारेकरी धारदार शस्त्रे घेवून त्याच्यामादगे धावत असताना सीसीटीव्हीत चित्रित दिसत आहे जुनी शुक्रवारीतील रस्ता ओलांडून गमछू एका गल्लीतून पलीकडे जातो. चारी मारेकरीही त्याचा पाठलाग करत त्या गल्लीत जातात आणि परत त्या गल्लीतून गमछू जीवाच्या आकांताने परत ज्या गल्लीतून आला होता त्याच  गल्लीत शिरतो असं या सीसीटीव्हीत दिसत आहे. मारेकरीही त्याचा पाठलाग तिथेही करतात. दरम्यान या सर्व हत्येचा तपास कोतवाली पोलीस करत आहे.

पूर्ववैमन्यासातून गमछूचा काटा काढला?

सुभाष शाहू क्रिकेट सटट्ट्यात मांडवली करायचा. या शाहुची काही वर्षांपूर्वी हत्या करण्यात आली होती. लकी खानने शाहुचा खून केला होता. गमछुवर या प्रकरणात सहभागी असल्याचा आरोप होता. लकी खानने शाहुचा खून करण्यासाठी साधूचा वेश धारण केला होता. साधू बनलेला लकी शाहूच्या घरी गेला. त्याला प्रसाद दिला. या प्रसादात लकीने साईनाईड लावलं होतं. त्यामुळे शाहूचा खेळ खल्लास होण्यास मदत झाली. तेव्हा गमछु हा लकीचा विश्वासू होता. गमछुनेच लकीला शाहू नेमक्या वेळेस कुठे आणि कधी येणार, याबाबतची माहिती दिली होती. 

तसेच गमछुनेच सुभाष शाहुला तो पेढा खाण्यासाठी प्रवृत्त केले होतं, असं म्हंटलं जातं. त्यामुळे गमछुवर सुभाष शाहूच्या खुनाच्या गुन्ह्यात सहभागी असल्याचा आरोप होता. मात्र पुराव्याअभावी गमछूची न्यायालयातून या प्रकरणातून निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. याप्रकरणी लकी खानवर गुन्हा दाखल होऊन त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली होती.

गमछूची निर्दोष सुटका झाली. त्यानंतर गमछू जुनी शुक्रवारी परिसरात क्रिकेट सट्टय़ात मांडवली करण्याचे आणि अवैध सावकारी करण्याचे काम करायचा. या व्यवहारातून गमछूचा अनेकांशी वाद होता. यातूनच अनेकांशी वाद निर्माण झाले. 

शाहुच्या मृत्यूच्या प्रकरणात गमछूचं नाव होतं. त्यामुळे  सुभाष शाहुच्या गटातील लोकही गमछूचे शत्रू झाले होते. मंगळवारी रात्री गमछू मोटारसायकलने घरी येत होता. याच दरम्यान गमछूच्या घराच्या आसपास हे 4-5 हल्लेखोर दबा धरुन बसले होते. यांच्याकडे धारधार शस्त्र होती. हल्लेखोर गमछूचा पाठलाग करीत त्याच्या मागेच येत होते. गमछू या हल्लेखोरांच्या कचाट्यात सापडला. सापडताच या हल्लेखोरांनी गमछूची शस्त्रांच्या मदतीने हत्या केली. 

तपास कोतवाली पोलीस या सर्व प्रकरणाचा तपास करत आहे. दरम्यान आता गमछूचा काटा काढण्यामागे नक्की कोणाचा हात आहे, हे लवकरच समजेल.