मुंबई : पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील काही भागांमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के बसले. कोल्हापूरमधील शाहुवाडी तालुक्यात भूकंपाचे केंद्र होते. भूकंपाची तीव्रता ४.५ रिश्टर स्केलवर नोंदली गेली. पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यात ते जाणवले.
भूकंपाचे धक्के शनिवारी रात्री १०.३० वाजता बसले. कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीतही भूकंपाचे धक्के जाणवले. दरम्यान, कोणतीही जीवितहानी झालेली नाही. तसेच कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातील सर्व धरणे सुरक्षित असल्याचंही सांगण्यात येत आहे.
विशेष म्हणजे यापूर्वी कोयना परिसरात हे धक्के जाणवत होते, अनेक वर्षानंतर कोल्हापूरच्या शाहुवाडी तालुक्यात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.