'१५ डिसेंबरनंतर रस्त्यावर खड्डा दिसणार नाही'

राज्यातील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या शहाण्णव हजार किलोमीटर रस्त्यावर १५ डिसेंबरनंतर एकही खड्डा दिसणार नसल्याची घोषणा, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

Updated: Oct 31, 2017, 04:18 PM IST
'१५ डिसेंबरनंतर रस्त्यावर खड्डा दिसणार नाही' title=

पंढरपूर : राज्यातील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या शहाण्णव हजार किलोमीटर रस्त्यावर १५ डिसेंबरनंतर एकही खड्डा दिसणार नसल्याची घोषणा, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. तर राज्यावर झालेल्या ४ लाख सतरा हजार कोटींच्या कर्जाबाबत श्वेतपत्रिका सरकार काढणार असून, ती जनतेसमोर आणणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणीची शासकीय पूजा केल्यानंतर ते बोलत होते. वारकरी संप्रदायाच्या मागणीनुसार मंदिर समितीच्या अध्यक्षपदाचा तोडगा काढण्यात आला असल्याचं त्यांनी सांगितलं. मंदिर समितीच्या अध्यक्षाबरोबरच वारकरी संप्रदायातून सहअध्यक्ष नेमण्याचं मंत्रीमंडळानं ठरवल्याचं ते म्हणाले. वारकरी संप्रदायाने तीन सदस्यांची नावं दिली तर सर्व वाद मिटतील असंही त्यांनी स्पष्ट केलं.