निवेदिता माने यांच्या आरोपात तथ्य नाही, राष्ट्रवादीने सगळे दिले - अजित पवार

निवेदिता माने यांनी राष्ट्रवादीवर जो आरोप केला त्याला राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिलेय.

Updated: Dec 15, 2018, 06:06 PM IST
निवेदिता माने यांच्या आरोपात तथ्य नाही, राष्ट्रवादीने सगळे दिले - अजित पवार title=

पुणे : राष्ट्रवादीने आपल्याकडे दुर्लक्ष केल्याने आपण शिवसेनेत प्रवेश केला. मी आता स्वगृही परत आलेय, असे शिवसेना प्रवेशानंतर निवेदिता माने यांनी आपली प्रतिक्रिया दिली. दरम्यान, राष्ट्रवादीने त्यांना सगळे काही दिले. राष्ट्रीय महिला अध्यक्ष पदही दिले. मात्र, त्यांच्याकडे संयम नाही, असे प्रत्युत्तर राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेय.

निवेदिता माने यांनी खासदारकी लढवायची ठरविले होते. आमची मित्र पक्षांशी बोलणी सुरू होती., त्यामुळे अजून काही ठरलेले नव्हते. स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी आमचे उमेदवार असतील असे गृहीत धरून त्या शिवसेनेकडे गेल्या. त्यांच्याकडे संयम नाही. त्यांना राष्ट्रीय महिला अध्यक्ष पद असं सगळं दिलं. तरीदेखील त्यांच्याकडे दुर्लक्ष होत असल्याचं म्हणत असतील तर त्यात तथ्य नाही, असे अजित पवार म्हणालेत. 

शिवसेनेचा राष्ट्रवादीला दे धक्का, निवेदिता माने सेनेत दाखल

भाजप विरोधात आघाडी करण्यासाठी राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा प्रयत्न आहे. त्यामुळे आघाडीमध्ये अनेकांना घेण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. जातीयवादी विचारसरणीला बाजूला ठेवण्यासाठी जे जे कोणी एकत्र येतील त्यांचं स्वागत युपीएमध्ये स्वागत आहे, असे अजित पवार म्हणालेत. 
  
जागावाटपाबाबत काँग्रेस सोबत बोलणी सुरू आहेत. 40 जागांवर एकमत झालय. 48 पैकी 8 जागांवर अजून अडले आहे. त्यात पुण्याचा समावेश आहे. तीन राज्यांतील निकाल काँग्रेसच्या बाजूने लागले असले तरी विजयी उमेदवार आणि पराभूत उमेदवारांच्या मतांमध्ये खूप कमी फरक आहे. त्यामुळे त्यांनी शहाने होण्याची गरज आहे, असा टोला अजित पवार यांनी काँग्रेसला हाणलाय.