नागपूर : कर्ज मुक्तीची मागणी नेहमी केली जाते... विरोधी पक्षात असताना आम्ही ही ती मागणी करत होतो, आताचे विरोधक ही ती मागणी करतायेत... मात्र, फक्त कर्जमुक्तीने प्रश्न सुटत नाहीत असे मत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले आहे.
मोदी सरकारच्या कार्यकाळाचे ३ वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्शवभूमीवर पत्रकार परिषदेत बोलत होते... या आधीही कर्जमुक्ती झाल्या आहेत... मात्र, तरीही शेतकरी आत्महत्या थांबलेल्या नाहीत... त्यामुळे कर्जमुक्तीसह सिंचन सोयी आणि शेती विषयक पायाभूत सोयी वाढविणे गरजेचे असल्याचे मत नितीन गडकरी यांनी व्यक्त केले आहे..
विदर्भात जोवर 50 टक्क्यांपर्यंत सिंचन वाढणार नाही, तोवर शेतकरी आत्महत्या थांबणार नाही असे ही गडकरी म्हणाले. महामार्गांजवळ दारू दुकाने नकोत. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर अनेक ठिकाणी महामार्ग डी नोटिफाय करण्याची मागणी केली जात आहेत... मात्र, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांच्या विभागाकडून एकही महामार्ग डी नोटिफाय करण्यास नकार दिले आहे.
राज्य सरकार जर काही महामार्ग डी नोटिफाय करायचे असेल तर त्यांनी ते करावे... मात्र, तसे झाल्यास माझ्या विभागाला त्या रस्त्यांवर कामे करता येणार नाही असा इशारा ही गडकरी यांनी दिलाय.