अचानक ट्रिगर दाबला गेल्याने गोळी सुटली आणि...

बंदूक साफ करत असताना अचानक ट्रिगर दाबला गेल्याने गोळी सुटली आणि त्यात पोलीस कर्मचारी जखमी झाला. 

Updated: May 28, 2017, 04:54 PM IST
अचानक ट्रिगर दाबला गेल्याने गोळी सुटली आणि... title=

यवतमाळ : बंदूक साफ करत असताना अचानक ट्रिगर दाबला गेल्याने गोळी सुटली आणि त्यात पोलीस कर्मचारी जखमी झाला. 

यवतमाळच्या वाघापूर परिसरातील शस्त्र सराव केंद्रावर हा अपघात घडला. अभय गोकुलकर असं जखमी पोलीस कर्मचा-याचं नाव आहे. ते शस्त्र सराव केंद्रातील बंदूक साफ करीत होते. तेव्हा अचानक ट्रिगर दाबलं गेलं आणि उजव्या हातात गोळी घुसली.

त्यांना तातडीनं यवतमाळच्या संजीवनी रुग्णालयात दाखल केलं. त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नागपूरला हलविण्यात आलंय.