नितेश राणे विजयी, वांद्र्याचा कवठ्यामहाकाळमुळे २० हजार मते वाढली - नीलेश

कणकवलीत भाजपचे उमेदवार नितेश राणे यांनी शिवसेनेचे उमेदावर सतीश सावंत यांचा पराभव केला.

Updated: Oct 24, 2019, 12:56 PM IST
 नितेश राणे विजयी, वांद्र्याचा कवठ्यामहाकाळमुळे २० हजार मते वाढली - नीलेश title=

कणकवली : राज्यात भाजप आणि शिवसेनेची युती झाली तरी याला अपवाद सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाहायला मिळाला. येथे जोरदार चुरस पाहायला मिळाली. कणकवलीत भाजपचे उमेदवार नितेश राणे यांनी शिवसेनेचे उमेदावर सतीश सावंत यांचा पराभव केला. त्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष साजरा केला. या विजयावर नितेश राणे यांचे बंधु नीलेश राणे यांनी कडवी प्रतिक्रिया दिली. त्यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना जोरदार टोला लगावला. यापुढे येथे शिवसेना नावाला उरणार नाही. येथे आता भाजपचेच राज्य असेल असे सांगत त्यांनी शिवसेनेला इशारा दिला. त्याचवेळी वांद्र्याचा कवठ्यामहाकाळ येथे आल्यामुळे २० हजार मते वाढली, असा दावा केला.

LIVE निकाल महाराष्ट्राचा : कोकण  

सिंधुदुर्गातून नितेश राणे विजयी झाले तरी कुडाळी आणि सावंतवाडी येथून शिवसेनेच्या उमेदवारांची विजयाच्या दिशेने वाटचाल आहे. वैभव नाईक आणि राज्यमंत्री दीपक केसरकर हे पुन्हा आपल्या जागा राखणार असेच चित्र आघाडी घेतल्यानंतर दिसून येत आहे. दरम्यान, रायगडमधील श्रीवर्धनमधून राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे यांनी विजय मिळवला आहे. तर रायगड जिल्ह्यात शिवसेनेला चांगले यश मिळाले आहे. मात्र, शेकापला पिछाडीवर जावे लागले आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेनेला चांगले यश मिळत असले तरी चिपळूणची जागा गमविण्याची भीती आहे. या ठिकाणी राष्ट्रवादी शेखर निकम यांनी सुरुवातीपासून आघाडी घेतली होती. त्यांनी येथून विजय मिळवला आहे.  रत्नागिरीत निर्विवाद उदय सामंत यांनी आपला विजय साकारला आहे. त्यांच्यासमोर विरोधकांचे तितकेसे आव्हान नव्हते. उदय सामंत यांनी सुरुवातीपासून आघाडी घेतली आहे.

तर शिवसेनेने खेड-दापोली येथील जागा खेचून आणताना दिसून येत आहे. पर्यावरण मंत्री रामदास कदम यांचे पूत्र योगेश कदम यांनी सुरुवातीपासून आघाडी घेतली. येथे राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार संजय कदम यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. तर राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलेले भास्कर जाधव यांना गुहागरमधून राष्ट्रवादीचे सहदेव बेटकर यांनी जोरदार टक्कर दिली आहे.   दरम्यान, राजापूर येथेही कडवी लढत पाहायला मिळत आहे. शिवसेनेचे राजन साळवी यांनी सुरुवातीला आघाडी घेतली होती.  

तुमच्या भागाचा निकाल पाहा एकाच क्लिकवर

LIVE निकाल महाराष्ट्राचा : मुंबई

LIVE निकाल महाराष्ट्राचा : कोकण

LIVE निकाल महाराष्ट्राचा : मराठवाडा 

LIVE निकाल महाराष्ट्राचा : विदर्भ

LIVE निकाल महाराष्ट्राचा : पश्चिम महाराष्ट्र

LIVE निकाल महाराष्ट्राचा : उत्तर महाराष्ट्र