सिंधुदुर्ग : शिवसैनिक संतोष परब (Santosh Parab) हल्ला प्रकरणी सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयाने अखेर भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे. त्यामुळे त्यांना अटक होण्याची शक्यता आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयासमोर राणे समर्थकांची मोठी गर्दी जमली. त्यांच्याबरोबर माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) हे ही उपस्थित आहेत. न्यायलायाने आपला निर्णय जाहीर केल्यानंतर निलेश राणे समर्थकांसह तिथे पोहचले.
कोर्टाने नितेश राणे यांचा जामीन अर्ज नाकारल्यानंतर ते कोर्टातून बाहेर पडताना पोलिसांनी त्यांची गाडी अडवली. यावेळी निलेश राणे गाडीतून खाली उतरले आणि त्यांनी पोलिसांना गाडी का अडवली असा जाब विचारला. निलेश राणे गाडीतून खाली उतरताच राणे समर्थकही आक्रमक झाले. कोणत्या अधिकाराखाली गाडी अडवली अशी विचारणा निलेश राणे यांनी पोलिसांकडे केली.
यावेळी निलेश राणे आणि पोलिसांदरम्यान बाचाबाची झाली. सुप्रीम कोर्टाने १० दिवसांपर्यंत अटकेपासून संरक्षण करण्याचान निर्णय दिला असताना कोणत्या आधारावर अडवताय अशी भूमिका निलेश राणे यांनी मांडली आहे. सुप्रीम कोर्टाचा आदेश असतानाही आमच्या मागेपुढे पोलिसांचा पहारा का ठेवला जात आहे, असा सवालही निलेश राणे यांनी उपस्थित केला. यावेळी निलेश राणे आणि पोलिसांदरम्यान बाचाबाची झाली. सुप्रीम कोर्टाने १० दिवसांपर्यंत अटकेपासून संरक्षण करण्याचान निर्णय दिला असताना कोणत्या आधारावर अडवताय अशी भूमिका निलेश राणे यांनी मांडली आहे.
नितेश राणे यांना अटक होणार?
संतोष परब (Santosh Parab) यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळत खालच्या न्यायालयात हजर व्हा, असे स्पष्ट आदेश दिले होते. चार वेळा नितेश राणे यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने नितेश राणे यांना जिल्हा न्यायालयात शरण जाण्यास तसेच नियमित जामिनासाठी अर्ज करावा, असे आदेश दिले होते. यासाठी न्यायालयाने नितेश राणे यांना 10 दिवसांची मुदत दिली होती. तसेच तोपर्यंत त्यांना अटक करु नये, असे निर्देश देत दिलासा दिला होता.
त्यानंतर काल नितेश राणे जिल्हा न्यायालयात हजर झाले होते. मात्र, जिल्हा न्यायालयाने आज दुपारी ३ पर्यंत निकाल राखून ठेवला होता. आज सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. त्यामुळे आमदार नितेश राणे यांना अटक होण्याची शक्यता आहे.