वर्धा दुर्घटनेतील बोट बुडण्याआधीचा व्हिडिओ आला समोर

Wardha boat accident : वर्धा नदीत बुडालेल्या बोटीसंदर्भात मोठी बातमी.  

Updated: Sep 16, 2021, 10:45 AM IST
वर्धा दुर्घटनेतील बोट बुडण्याआधीचा व्हिडिओ आला समोर title=

अमरावती : Wardha boat accident : वर्धा नदीत बुडालेल्या बोटीसंदर्भात मोठी बातमी. या दुर्घटनेतील बोट बुडण्याआधीचा व्हिडिओ 'झी 24तास'च्या हाती लागला आहे. अस्थी विसर्जन करताना बोट बुडाली आणि 11जणांना जलसमाधी मिळाली. ( Video before a boat capsizes in the Wardha River)

झुंज इथल्या वर्धा नदीमध्ये एक जण बोटीबाहेर निघून अस्थी विसर्जन करत होता. या दुर्घटनेत बोटीतले 11 जण बुडाले. त्यापैकी केवळ 5 जणांचे मृतदेह शोधण्यात यश आले आहे. आणखी 6 जणांचा अजूनही शोध सुरु आहे. NDRF, SDRF आणि DDRF पथके शोध घेत आहेत. वरूड तालुक्यातील गाडेगाव इथल्या मटरे कुटुंबासोबत ही दुर्घटना घडली. 

अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील झुंज येथील तीर्थ येथे वर्धा नदीत पर्यटन करण्यात गेलेल्या एकाच कुटुंबातील नातेवाईकांची बोट नदीत बुडाली. यामध्ये मंगळवारी तीन मृतदेहांचा शोध लागला मात्र आठ मृतदेह शोधन्याचे काम बचाव पथकाकडून सुरू असून बुधवारी दिवसभरात एकही मृतदेह हाती लागला नव्हता. त्यामुळे आज पुन्हा पहाटे पासून बचाव कार्य सुरू झाले आहे. दरम्यान, दुर्घटनेपूर्वीचा व्हिडिओ समोर आला आहे.