कोल्हापूर : काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीमध्ये भारिप बहुजन संघाचे प्रकाश आंबेडकर यांनाही आणण्याचा प्रयत्न सुरू आहे, अशी माहिती राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी दिलीय. भाजप आणि शिवसेनेला सत्तेवर दूर ठेवायचं असेल तर धर्मनिरपेक्ष विचाराच्या लोकांनी एकत्र आलं पाहिजे, असं मत त्यांनी कोल्हापूरमधील राष्ट्रवादीच्या युवा परिषदेत बोलताना व्यक्त केलं.
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवण्यासाठी येत्या २ नोव्हेंबरला पुन्हा काँग्रेस नेत्यांसोबत बैठक होतेय. गेल्यावेळी २३-२५ असा फॉर्म्युला होता. यावेळी २४-२४ असं जागावाटप व्हावं, असं अजित पवार म्हणाले.