राष्ट्रवादीच्या 'या' महिला नेत्याने केली सदाभाऊंवर या शब्दात टीका, म्हणाल्या... केतकी वाचून....

मराठी अभिनेत्री केतकी चितळे हिला अटक झाली. तिच्याविरोधात टिकेची झोड उठली असताना सदाभाऊ खोत यांनी तिचे समर्थन केले आहे. यावरून राष्ट्रवादीच्या महिला नेत्यांनी सदाभाऊ खोत यांच्यावर टीका केलीय.

Updated: May 16, 2022, 02:36 PM IST
राष्ट्रवादीच्या 'या' महिला नेत्याने केली सदाभाऊंवर या शब्दात टीका, म्हणाल्या... केतकी वाचून.... title=

पुणे : शरद पवार ( Shard Pawar ) यांच्याबद्दल पोस्ट केल्यानंतर मराठी अभिनेत्री केतकी चितळे ( Ketki Chitle ) हिला अटक झाली. तिच्याविरोधात टिकेची झोड उठली असताना सदाभाऊ खोत ( Sadabhau Khot ) यांनी तिचे समर्थन केले आहे. यावरून राष्ट्रवादीच्या महिला नेत्यांनी सदाभाऊ खोत यांच्यावर टीका केलीय.

केतकी चितळे हिचा मला अभिमान आहे. ती कणखर आहे. तिला समर्थनाची गरज नाही. न्यायालयात तिने स्वतःची बाजु मांडली तिला मानावे लागेल, अशा शब्दांत खोत यांनी केतकीचे कौतुक केले आहे.

सदाभाऊ खोत ( Sadabhau Khot ) यांनी केतकीचे समर्थन केल्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील ( Rupali Patil ) यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. सदाभाऊंना केतकीच्या 'तुझं माझं जमेना' ही मालिका आवडली असावी. सदाभाऊ शेतकरी नेते आहेत. त्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावावेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर त्यांनी भांडावं. 

'तुझं माझं जमेना' ही सीरिअल नक्कीच सदाभाऊंना आवडली असेल म्हणूनच त्यांनी केतकीचे समर्थन केले. त्यांनी तिला घरी घेऊनही जावं. पहा! त्यांच्या वहिनी तिचं स्वागत करतात का? अशा भाषेत राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली पाटील ( RUpali Patil ) यांनी सदाभाऊच्या समर्थनाला उत्तर दिलंय.

राजू शेट्टी यांच्याबरोबरही त्यांचं जमलं नाही आणि सदाभाऊ त्यावर आता वेगळं काही बोललं तर आवडेल का? अशा शब्दात रूपाली पाटील यांनी सदाभाऊ खोत यांच्यावर टीका केली.