आताची मोठी बातमी, फोन टॅपिंग प्रकरणात एकनाथ खडसे यांचा गौप्यस्फोट

Eknath Khadse on phone tapping case : फोन टॅपिंग प्रकरणी आताच्या घडीची मोठी बातमी. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी फोन टॅपिंग प्रकरणी मोठा गौप्यस्फोट केला आहे.  

Updated: Apr 11, 2022, 03:12 PM IST
आताची मोठी बातमी, फोन टॅपिंग प्रकरणात एकनाथ खडसे यांचा गौप्यस्फोट title=

मुंबई : Eknath Khadse on phone tapping case : फोन टॅपिंग प्रकरणी  (Phone Tapping Case) आताच्या घडीची मोठी बातमी. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी फोन टॅपिंग प्रकरणी मोठा गौप्यस्फोट केला आहे. खडसे यांचा फोन 67 दिवस टॅप  तर शिवसेना नेते संजय राऊत यांचा फोन 60 दिवस टॅप केल्याची माहिती खडसे यांनी दिली आहे. दरम्यान, नाव न घेता खडसे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. (NCP Senior leader Eknath Khadse gave big information on phone tapping case)

सत्तासंघर्षाच्या काळात हा सगळा प्रकार हंगामी मुख्यमंत्र्यांनी केल्याचा आरोप खडसे यांनी 'झी 24 तास'शी बोलताना केला. त्यामुळे खडसे यांनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांवर नाव न घेता निशाणा साधला आहे. खडेस यांनी यावेळी सांगितले की, माझा फोन तब्बल 67 दिवस टॅपिंगवर होता. तर संजय राऊत यांचाही फोन 60 दिवस टॅपिंगवर होता. ही सगळी माहिती खडसे यांची फोन टॅपिंगप्रकरणी जबाबात दिली आहे.

रश्मी शुक्ला यांच्याकडून फोन टॅपिंग करण्यात आले होते. त्यानंतर ही चौकशी पोलिसांकडून करण्यात येत आहे. दोन वेळा रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांची चौकशी करण्यात आली आहे. याआधी संजय राऊत यांची चौकशी झाली होती. आता खडसे यांचीही चौकशी झाली. फोन टॅपिंग (Phone Tapping Case) प्रकरणात संजय राऊतांचा (MP Sanjay Raut यांचा मुंबई पोलिसांना जबाब नोंदवला.

फोन टॅपिंग प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर आता पोलिसांकडून तपास सुरु आहे. मविआ सरकारच्या सत्ता स्थापनेच्या काळात संजय राऊत, एकनाथ खडसे यांचे फोन टॅप झाल्याचा समोर आले होते. या प्रकरणी 2 मार्च रोजी कुलाबा पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे आणि शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांचा फोन टॅप केल्याप्रकरणी आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला.