अजित पवारांनी राष्ट्रवादीच्याच नगरसेवकांना दिला दम

गटबाजी खपवून घेतली जाणार नाही, असा सज्जड दम बारामती नगरपालिकेतील राष्ट्रवादीच्या चाळीस नगरसेवकांना अजित पवार यांनी दिलाय.

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Feb 2, 2018, 07:47 PM IST
अजित पवारांनी राष्ट्रवादीच्याच नगरसेवकांना दिला दम  title=

बारामती : गटबाजी खपवून घेतली जाणार नाही, असा सज्जड दम बारामती नगरपालिकेतील राष्ट्रवादीच्या चाळीस नगरसेवकांना अजित पवार यांनी दिलाय.

आयुष्यात पुन्हा पद देणार नाही 

माझ्यावर सह्या करून  दबाव आणण्याचा कोणी प्रयत्न केला, तर खपवून घेतले जाणार नाही, असंही त्यांनी म्हटलय. ज्यांच्या ज्यांच्या सह्या आहेत त्यांना उभ्या आयुष्यात परत कोणतेही पद देणार नाही.

'त्याच जागा निवडून आणू'

हे सांगतानाच २० नगरसेवकांचे राजीनामे घेवून, पुन्हा त्या जागा निवडून आणूच, असा विश्वास त्यांनी अजित पावरांच्या शैलीत सांगीतलाय.