कोपरगाव : राज्यासह देशात विमानतळाची संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न केला जातोय. मात्र याचाच फायदा काही भामटे घेतांना समोर आलंय. चक्क विमान प्राधिकरणाची जमीनच परस्पर प्लॉट दाखवून लाखो रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आलाय.
कोपरगाव तालुक्यातील काकडी विमानतळाजवळ प्लॉट देण्याचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचं समोर आले.
या संदर्भात खान्देशातील जळगाव येथे प्रॉपर्टी मेळा देखील भरविण्यात आला होता आणि राज्य शासनानं विमानतळासाठी हस्तांतरित केल्याचं जमिनीचे प्लॉट पाडत आगाऊ बुकिंग करत कोट्यवधी रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आलाय.
जवळपास आठशे नागरिकांची आगाऊ नोंदणी प्लॉटधारक म्हणून केली असल्याची माहिती तक्रादारांनी दिलीय.
तक्रारदार संख्या जवळपास आठवर येऊन या आठ तक्रारदारांची रक्कम जवळपास २४ लाख रुपयांपर्यंत आहे. या संपूर्ण प्रकरणाची नोंद नाशिकच्या सरकारवाडा पोलिसांत करण्यात आलीय.
शासनाने काकडीच्या विमातळासाठी हस्तांतरित केलेली जमीन दाखवून प्लॉट घेण्यासाठी इच्छुक असलेल्या नागरिकांचा विश्वास संपादन करत मोरया कन्स्ट्रवेल कंपनीच्या चार ते पाच भामट्यांनी गैरप्रकार केलाय.
यामध्ये कंपनीच्या नावाने एका खासगी बँकेत खाते उघडले, प्लॉटधारक म्हणून नोंदणी केलेल्या नागरिकांकडून वेळोवेळी एक लाख ते पाच लाखांपर्यंत पैसे उकळले, प्लॉट एनए करून ताब्यात दिले जाईल असे सांगण्यात आले होते.
अनेक दिवस उलटल्यानंतरही जमीन ताब्यात मिळत नसल्याने तक्रादारांना संशय आला आणि त्यांनी थेट पोलीस स्टेशनच गाठले आणि गुन्हा दाखल केला.
याबाबत गुन्हा जरी दाखल करण्यात आला असला तरी ठोस पाऊले उचलली जात नाही आणि पैसे मिळेल याची कुठलीही शाश्वती दिसत नाही त्यामुळे तक्रारदारांची चिंता अधिकच वाढलीय.
एकंदरीतच या प्रकरणातील फसवणुक झालेल्या तक्रारदारांनी एकत्रित होऊन ठोस पाऊले उचलणे गरजेचे आहे.
गेलेली रक्कम परत मिळवून द्यावी यासाठी शासनाने शा चुकीच्या झालेल्या नोंदीबाबत नियमावली करणे तसेच अशी फसवणूकीची नोंद कार्यलयात करणे गरजेचे आहे