Video Viral : 'अरं मूर्खंय का?', टॉयलेटबाहेर फळं धुणाऱ्या ज्युसवाल्यावर संतापले अजित पवार

Video Viral : गेल्या काही दिवसांपासून व्हिडीओ व्हारयल होणं आणि मग त्याची बेसुमार चर्चा होणं या साऱ्याचं प्रमाण कमालीचं वाढलेलं दिसत आहे. 

Updated: Dec 23, 2022, 01:12 PM IST
Video Viral : 'अरं मूर्खंय का?', टॉयलेटबाहेर फळं धुणाऱ्या ज्युसवाल्यावर संतापले अजित पवार  title=
ncp leader Ajit pawar slams juice venfor as he washes fruits outside the toilet

Video Viral : गेल्या काही दिवसांपासून व्हिडीओ व्हारयल होणं आणि मग त्याची बेसुमार चर्चा होणं या साऱ्याचं प्रमाण कमालीचं वाढलेलं दिसत आहे. याच व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत नुकतीच आणखी एका व्हिडीओची भर पडली. यामध्ये राष्ट्रवादीचे नेते (ncp leader), राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं काहीसं वेगळं रुप पाहायला मिळत आहे. सोशल मीडियार सध्या हा व्हिडीओ कमालीचा शेअर केला जात आहे. 

असं काय झालं की अजित पवार संतापले? 

विधीमंडळ परिसरात भांडी टॉयलेटमध्ये धुतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला. ज्यामध्ये कप बशा टॉयलेटमध्ये धुतल्याचा व्हिीओ व्हायरल झाला होता. त्यामागोमाग आता आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यामुळं सदर परिसरात स्वच्छतेचा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे. इतकंच नव्हे तर, याकडे अन्नुपुरवठा निरीक्षक लक्ष देत नाहीयेत ही बाब समोर आलीये. इतकंच नव्हे तर, नागपूर शहरातील खाद्यपदार्थांच्या स्टॉल्सची काय परिस्थिती असेल, याविषयीसुद्धा आता चर्चा सुरु झालीये. 

हेसुद्धा वाचा : अमोल मिटकरी यांनी व्हिडिओ ट्विट केला; अजित पवार संतापलेत, म्हणाले - किती हा नालायकपणा?

 

या साऱ्यामध्ये अजित पवार यांनी ज्युस विक्रेत्याला खडे बोल सुनावत त्याची झाडाझडती घेत त्याला समज दिल्याचं पाहायला मिळालं. जागा नसल्यानं शौचालयाबाहेरच फळं स्वच्छ करत असल्याचं ज्यूस सेंटरमध्ये दिसून आलं आणि ते पाहून अजित पवार यांनाही धक्का बसला. 

'कुठे फळं बिळं धुताय... मूर्खंय का काय? असं करु नका...' असं म्हणत अजित पवार इथं नाराजीचा सूर आळवताना दिसत आहेत. आरोग्याच्या काळजीपोटी अजित पवार यांनी ज्यूस विक्रेत्याला खडसावलं आता या प्रकरणी पुढे नेमकी कोणती कारवाई होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

दरम्यान, आमदार निवासात कपबशा धुण्यासाठी शौचालयाचं पाणी वेटरनं वापरल्याचा दावा अमोल मिटकरी यांनी यापूर्वी केला होता. यात एक वेटर कपबशा धुण्यासाठी चक्क शौचालयातलं पाणी वापरत असल्याचं दिसत आहे. हजारो कोटींचे टेंडर कंत्राटदाराला दिल्यानंतर आमदारांच्या कपबशा धुण्यासाठी कंत्रादारांकडून विशेष टॉयलेटची व्यवस्था केल्याचा आरोप अमोल मिटकरी यांनी केला. या प्रकरणाची चौकशी करण्याचीही त्यांनी मागणी केली होती.