"मनिषा कायंदे यांच्याकडून माजी आमदाराचे ब्लॅकमेलिंग"; राहुल शेवाळे यांचा लेटरबॉम्ब

Rahul Shewale : खासदार राहुल शेवाळे यांची एसआटीमार्फत चौकशी व्हावी अशी मागणी आमदार मनिषा कायंदे यांनी गुरुवारी विधान परिषदेत केली होती. त्यानंतर आता राहुल शेवाळे यांनी कायंदे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत

Updated: Dec 23, 2022, 01:48 PM IST
"मनिषा कायंदे यांच्याकडून माजी आमदाराचे ब्लॅकमेलिंग"; राहुल शेवाळे यांचा लेटरबॉम्ब title=

Maharashtra Politics : खासदार राहुल शेवाळे यांनी माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपांनंतर राजकीय वातावरण तापलं आहे. अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूपूर्वी आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी रिया चक्रवर्तीला अनेक फोन केल्याचा आरोप शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांनी बुधवारी केला होता. त्यानंतर आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत. ठाकरे गटाच्या आमदार मनिषा कायंदे (Manisha Kayande) यांनी राहुल शेवाळे यांची एसआयटी मार्फत चौकशी व्हावी अशी मागणी विधान परिषदेत केली आहे. 

त्यानंतर आता खासदार राहुल शेवाळे यांनी मनिषा कायंदे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. खासदार राहुल शेवाळे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना पत्र लिहीत हे आरोप केले आहेत. मनिषा कायंदे यांच्याकडून एका माजी आमदाराला ब्लॅकमेलिंग करण्यात आल्याचा आरोप राहुल शेवाळे यांनी केला आहे. मनिषा कायंदे यांनी माजी आमदाराकडे खंडणी मागितल्याचा आरोपही शेवाळे यांनी केलाय. डी. के. रावमार्फत या धमक्या दिल्याचे शेवाळे यांनी म्हटलं आहे.

काय म्हटंलय पत्रात?

"माझ्याकडे काही गंभीर माहिती प्राप्त झालेली आहे. या माहितीबाबत तपशील हा धक्कादायक आहे. सन 2007-08 मध्ये जेष्ठ नेते मा. आमदारांबरोबर लग्न मढ आयलॅंड बोरिवली येथील बंगल्यात जेष्ठ नेते माजी मंत्र्यांच्या उपस्थितीत पण अनौपचारिक 2010 -11 मध्ये सदर नेत्याला त्यांच्या विरोधात तक्रारी; लैंगिक शोषण, भोईवाडा पोलीस ठाणे येथे दाखल केल्या. सायन विधानसभा येथून भाजपतर्फे, 2009 मध्ये निवडणूक लढवली व  याच्याच आधारावर निवडणुक निधी म्हणून रुपये पन्नास लाखांची मागणी व ती मान्य न झाल्यामुळे तक्रारी म्हणजेच ब्लॅकमेलींगला सुरुवात केली. दरम्यानच्या काळात त्या जेष्ठ नेत्याला कळले म्हणजे निदर्शनास आले की त्याच्या स्वीय सहाय्यकाबरोबर सदरच्या महिलेने दारु पिऊन रंग उधळणे, रात्री 2/3 वाजेपर्यंत चालू झाले होते. त्याचप्रमाणे वेलु नामक धारावी स्थित होर्डिंगचा व्यवसाय करणाऱ्या व्यक्ती बरोबर सुद्धा दारु पिणे इ. चालू होते. सदर नेत्याचा लालबाग येथील 1 बीएचके फ्लॅटमध्ये टाळे तोडून ताबा घेतला. त्या सोसायटीने रितसर कायदेशीर कारवाई करुन त्यांना बाहेर काढले. गाडी, ड्रायव्हर, घरखर्च तेच करत होते. किमान 3 वेळा विदेश यात्रा, सोने त्यांच्याकडून प्रचंड प्रमाणात घेतले. एम. डी. कॉलेजमध्ये लेक्चरर म्हणून त्यांनीच लावले व त्यासाठी एम.डी. कॉलेजला 1 कोटी इतका सरकारी विकास निधी दिला. PHDसाठी गाईड सुभाषनगर, चेंबूर येथील प्राध्यापक त्यांनीच देऊन PHD हातात पडेपर्यंतचा सर्व खर्च त्यांनीच केला.  कुप्रसिद्ध गॅगस्टर डी.के. राव याच्याकडून सदर नेत्याला धमक्या देणे, दबाव आणणे इ. उद्योग सुरु केले," असे अनेक गंभीर आरोप राहुल शेवाळे यांनी केले आहेत.

मनिषा कायंदे यांचे आरोप

राहुल शेवाळे यांच्यावर अत्याचाराचे आरोप केलेल्या महिलेला मुंबईत यायचे आहे, तिला येऊ दिले जात नाही, अत्याचार आणि बलात्काराचे आरोप असतांनाही कारवाई होत नाही. त्यामुळे याप्रकरणाची एसआयटी चौकशी व्हावी अशी मागणी आमदार मनिषा कायंदे यांनी गुरुवारी विधान परिषदेत केली आहे.