नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात ६ जवान शहीद, २ जखमी

 या हल्ल्यात ६ जवान शहीद, २ जखमी झाल्याचे वृत्त आहे. 

Updated: May 20, 2018, 02:25 PM IST

दंतेवाडा : दंतेवाडामध्ये नक्षलवाद्यांनी भारतीय जवानांवर हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. या हल्ल्यात ६ जवान शहीद, २ जखमी झाल्याचे वृत्त आहे. नक्षलींकडून आयईडीचा स्फोट करण्यात आला.  नक्षलविरोधी अभियानातील सर्वाधिक यशस्वी आणि ऐतिहासिक ऑपरेशन गडचिरोली पोलिसांनी अतिदुर्गम इंद्रावती नदी परिसरात राबविले होते. याचा बदला घेण्यासाठी हा हल्ला करण्यात आल्याचा अंदाज आहे. नक्षलवाद विरोधी ऐतिहासिक ऑपरेशनचा बदला घेतला जाईल असे फलक गेले काही दिवस परिसरात दिसत होते.