Uran Murder Case Update: उरणमधील यशश्री शिंदे हत्येप्रकरणामुळे राज्यात खळबळ उडाली आहे. या हत्या प्रकरणात मोठी अपडेट सोमर आली आहे. या प्रकरणातील आरोपी दाऊद शेख याचा पोलिसांसमोर धक्कादायक खुलासा केला आहे. यशश्रीची हत्या का केली याचा कबुली जबाबच त्याने पोलिसांना दिला आहे. पनवेल न्यायालयाने आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
यशश्री शिंदे हत्ये प्रकरणी आरोपी दाऊद शेख याच्या अटकेनंतर अनेक खुलासे समोर येत आहेत. लग्न करुन कर्नाटकला चल असा तगादा दाऊद लावत होता मात्र यशश्री याला नकार देत रिस्पॉन्ड करत नसल्याने दाऊदने यशश्रीची हत्या करण्याचा निर्णय घेतला होता. हत्या करण्याच्या उद्देशानेच दाऊद शेख धारदार हत्यार घेऊन कर्नाटक वरून उरण मध्ये आला होता.
इथे आल्यावर वारंवार तो यशश्री ला भेटण्यासाठी ये अशी मागणी करत होता. मात्र यशश्री याला नकार देत होती. दाऊद शेख कडे यशश्रीचे काही फोटो होते ते फोटो फेसबुक वर टाकून यशश्रीला जबरदस्ती भेटायला बोलावले होते. भेटायला आल्यावर दाऊद शेख ने सर्व फोटो डिलिट केले. भेटीच्या वेळी देखील आरोपी दाऊद हा यशश्रीकडे लग्नाचा आणि कर्नाटक मध्ये येण्याचा तगादा लावत होता, मात्र यशश्री नकार देत असल्याने त्याने तिची धारदार हत्याराने वार करत हत्या केली.
हत्ये नंतर दाऊद यशश्रीचा मोबाईल आणि हत्यार घेऊन कळंबोली येथून कर्नाटकची बस पकडून गावी निघून गेला. याप्रकारणात अद्याप यशश्रीचा मोबाईल आणि हत्या केलेले हत्यार पोलिसांना सापडले नसून आरोपीज्या फोटो द्वारे ब्लॅकमेल करत होता त्या फोटोचा शोध देखील पोलीस घेत आहेत. हत्येच्या दिवशी यशस्वी ने तिच्या एका मित्राला फोन करून मदत मागितली मात्र नेटवर्क नसल्यामुळे दोघांमध्ये संभाषण होऊ शकले नाही
हे सगळं प्रकरण आता उलगडले असलं तरी ही घटना टाळता आली असती कारण हात्येच्या 5 दिवस आधीच आरोपी वर दाखल पोस्को गुन्ह्यात पनवेल न्यायालयाने दाऊद शेख विरोधात नॉन बेलेबल वॉरंट काढून त्याला लवकर अटक करण्याचे आदेश पोलीसांना दिले होते. पोलिसांनी या आदेशाचे गांभीर्याने पालन केले असते तर दाऊद ला हत्या करण्याच्या आधीच अटक करण्यात आली असती आणि यशश्रीची झालेली निर्घृण हत्या टाळता येऊ शकली असती. मात्र याबद्दल अद्यापही पोलीसाना कुठलीही कल्पना नसल्याची धक्कादायक माहिती समोर आलेय.