नाशिक : मराठवाड्यात पावसाने दडी मारली असली, तरी नाशिक जिल्ह्यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे जायकवाडीत विक्रमी पाणीसाठा होण्याची शक्यता आहे. नाशिक जिल्ह्यात धरण क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्यामुळे धरणं भरली आहेत. धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे.
गंगापूर आणि दारणा धरणातून सोडण्यात आलेला पाणीसाठा हा नांदूरमधमेश्वर धरणातून जायकवाडीकडे वळवण्यात येतो. आतापर्यंत २२ टीएमसी पाण्याचा विसर्ग मराठवाड्यासाठी जायकवाडीत सोडण्यात आलाय. आज पुन्हा एकदा पावसाने जोरदार हजेरी लावण्यास सुरूवात केल्याने जायकवाडीत विक्रमी पाणीसाठी होऊ शकेल अशी शक्यता आहे.