कांद्याचा दर 1 रुपया प्रति किलो, शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी

 कांदा १ रुपया प्रति किलो दरानं विकला गेला

Updated: Sep 22, 2018, 11:13 AM IST
कांद्याचा दर 1 रुपया प्रति किलो, शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी   title=

नाशिक : कांद्याचे भाव वाढले की शहरातल्या लोकांच्या डोळ्यात पाणी येतं आणि कांद्याचे भाव कमी झाले की ग्रामीण भागात शेतकऱ्यांचे डोळे पाणावतात. हे विषम चित्र ​बदलण्याचे नाव घेत नाहीयं. सरकारने यावर अनेक उपाययोजना करण्याचा प्रयत्न केला पण प्रत्यक्षात शेतकऱ्याला डोक्यावर हात लावण्याशिवाय पर्यायच उरला नाहीयं. नाशिकमध्ये कांद्याच्या दरात मोठी घसरण झालीये.. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला ६५० रुपये प्रति क्विंटचला भाव मिळतोय. कमी आणि मध्यम प्रतिच्या कांद्याला तर २५० रुपये प्रति क्विंटलचा भाव मिळतोय. दरम्यान मनमाडमध्ये कांद्याला फक्त १०० रुपये क्विंटलचा भाव मिळाला.

१ रुपया प्रति किलो दर

 अर्थात कांदा १ रुपया प्रति किलो दरानं विकला गेला त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत मुंबई- आग्रा महामार्गावर कांदा फेकत आपला संताप व्यक्त केला. कांद्याला एक क्विंटल उत्पन्न घेण्यासाठी सातशे ते आठशे रुपये इतका खर्च येतो. उत्पादन खर्चही निघत नसल्यानं कांदा उत्पादक शेतकरी हवालदील झालाय. कांदा महाग झाल्यावर राज्यभरातून त्यावर प्रतिक्रिया येतात. आज कांद्याला बाजारभाव नसल्याने शेतकऱ्यावर वाईट दिवस आले आहेत. यावर उपाययोजना होण्याची नितांत गरज आहे.