Nashik Child Death: मधाचं पोळ काढणे बेतलं जीवावर, विहिरीत पडून चिमुकल्याचा मृत्यू

Nashik Child Death: दुपारच्या सुमारास विहीरीजवळ असणारे मोहोळ काढण्यासाठी ऋषिकेश गेला होता तेव्हा मोहोळ (honeycomb maze) काढत असताना ऋषिकेशच्या पाठीमागे मधमाशा लागल्याने तो सैरावैरा पळत सुटला. 

Updated: Nov 27, 2022, 10:41 AM IST
Nashik Child Death: मधाचं पोळ काढणे बेतलं जीवावर, विहिरीत पडून चिमुकल्याचा मृत्यू title=
child death after falling into well

योगेश खरे, झी मीडिया, नाशिक: लहान मुलांच्या बाबतीत सध्या अनेक तऱ्हेच्या घटना घडताना (child news nashik) दिसत आहेत. सध्या असाच एक प्रकार नाशिक येथे घडला आहे. नाशिकच्या सुरेगाव (suregoan in nashik) रस्ता येथे मोहोळ काढण्याचा मोह अंगलट आल्यामुळे विहिरीत (well) पडून 12 वर्षीय बालकाचा (child dies) दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सध्या या घटनेनं परिसरात खळबळ माजून दिली आहे. शनिवारी दुपारी येवला तालुक्यातील (yeola in nashik paithani) रस्ते सुरेगाव येथे 40 फूट खोल पाण्यानं भरलेल्या विहिरीत पडून ऋषिकेश गजानन या 2 वर्षीय बालकाचा मृत्यू झाला आहे. दुपारच्या सुमारास विहीरीजवळ असणारे मोहोळ काढण्यासाठी ऋषिकेश गेला होता तेव्हा मोहोळ (honeycomb maze) काढत असताना ऋषिकेशच्या पाठीमागे मधमाशा लागल्याने तो सैरावैरा पळत सुटला आणि त्यातून अचानक ऋषिकेशचा पाय विहिरीच्या कठड्यावरून घसरून विहिरीत पडला आणि त्यातच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. (nashik news a 12 year boy dies in nashik after hurry to capture honeycomb maze)

हृषिकेश मध्येच कुठेतरी गायब झाल्याने त्याच्या घरांच्यानीही शोधाशोध सुरू केली. परंतु नंतर तो विहीरीत पडल्याचे तिकडच्या नागरिकांना समजले आणि तो मृत झाल्याचे घोषित झाले. घडल्या प्रकारानं सगळीकडेच शोक व्यक्त केला जात असून या प्रकारानं ऋषिकेशच्या घरच्यांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. सध्या अशा प्रकारांना आळा घालण्याची (child death shocking news) गरज आली आहे. कारण पालकांचे मुलांकडे लक्ष नसले की कळत - नकळत मुलांच्या जीवावरही ते बेतू शकते असे निरिक्षण या घडल्या प्रकारातून समोर येते आहे. त्यामुळे अशा घटनांमुळे पालकांना आता आपल्या मुलांकडे अधिक लक्ष देत त्यांच्या सुरक्षिततेचा गांभिर्यानं विचार करण्याची वेळ आली आहे. 

हेही वाचा - पत्नीकडे पाहू नको बोलल्याचा राग मनात धरत तो थेट घरात शिरला अन्... थराराक घटना

मधाचा मोह नडला

लहान मुलांना अनेक गोष्टींचा मोह निर्माण होतो मग त्यासाठी ते स्वतःहून पुढाकार घेतात आणि मग कुणाचीही मदत न घेता ते ती गोष्ट घेण्याच्या मोहात कसलाही विचार करत नाहीत सध्या काहीचा असाच एक प्रकार नाशिकमध्ये घडला आहे. मधाच्या मोहातून नाशिक येथे एका बारा वर्षीय बालकाचा तलावात पडून मृत्यू झाला आहे. शनिवारी दुपारी येवला तालुक्यातील रस्ते सुरेगाव येथे विहिरी जवळील मोहोळ काढण्यासाठी ऋषिकेश गेला होता. मोहोळ काढत असताना ऋषिकेशच्या पाठीमागे मधमाशा लागल्याने तो जीव (how to safe overselves from honeybee attacks) वाचवत सैरावैरा पळू लागला. अचानक ऋषिकेशचा पाय विहिरीच्या कठड्यावरून घसरल्याने तो अचानक विहिरीत पडला आणि त्यातच त्याचा दुर्दैव मृत्यू झाला. 

हेही वाचा - Inspirational Story: गडचिरोलीच्या सुपुत्राची अभिमानास्पद कामगिरी, डॉ. भास्कर हलामी यांची अमेरिकेत वरिष्ठ वैज्ञानिक म्हणून नियुक्ती

परिसरात हळहळ 

40 फूट खोल पाण्याने भरलेल्या विहिरीत पडलेल्या या मुलाचे संपुर्ण नाव ऋषिकेश गजानन चव्हाण असे आहे. दुपारी दोन वाजल्यापासून खेळायला गेलेला ऋषिकेश घरी न आल्यानं त्याच्या नातेवाईकांनी परिसरात शोधाशोध सुरू केली. घराशेजारीलच विहिरीत ऋषिकेश पडला असावा असा संशय आल्याने शोध मोहीम सुरू करण्यात आली होती. पाच ट्रॅक्टरच्या (motorpump and trakter) मोटरपंप साहाय्यानं पाणी उपसा सुरू करण्यात होता. त्यादरम्यान येवला शहर व परिसरातील पोहोणाऱ्यांना या ठिकाणी बोलवण्यात आलं होतं. सदरची शोधमोहीम सुरू असताना विहिरीच्या तळाशी ऋषिकेशचा मृतदेह आढळून आल्याने या घटनेमुळे परिसरातील लोकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.