नाशिक : नाशिक शहरासह जिल्ह्यात परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. विजेच्या गडगडाटासह वादळी पाऊस शहरात झाला. गंगापूर धरण समूहातून तसंच, इतर धरणातून पुन्हा विसर्ग करण्यास सुरुवात झाली आहे.
नाशिक शहरात रामकुंडावर पुरसदृश स्थिती होती. गोदावरी काठी असलेल्या सराफ बाजार परिसरामध्ये नाले, गटारी बंद झाल्याने पाणी तुंबले होते. त्यात दुसऱ्या बाजूला नदी असल्याने पाणी जाण्याचा मार्ग बंद झाला. त्यामुळे सराफ बाजार, फुल बाजार पाण्याखाली होता. पावसामुळे गेल्या चोवीस तासात ३ बळी गेले आहेत. काढणीला आलेल्या कांदा पिकांत पाणी शिरले असल्याने शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे.